Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : नांदेडला खरीप पेरणी ९२ टक्क्यांवर

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे खरिपातील पेरण्या अंतिम टप्यांत आल्या आहेत. रविवारपर्यंत (ता. १४) ९२.१९ टक्क्यांनुसार सात लाख सहा हजार ८९५ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वाधीक चार लाख १२ हजार ५६२ हेक्टरवर सोयाबीन तर एक लाख ९८ हजार १३३ हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात काही भागात खरिपाच्या पेरण्यांची सुरुवात मृग नक्षत्रात झाली. यानंतर काही दिवस पावसाने पाठ फिरविल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु जून महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने दमदार सुरवात केली. यामुळे पेरण्यांच्या कामांना वेग आला. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या २३५.५० मिलीमीटरनुसार २६.४२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण चांगले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पेरण्यांची आटोपली आहेत. जिल्ह्यात रविवारपर्यंत ९२ टक्क्यांनुसार सात लाख ६ हजार ८९५ हेक्टरवर खरिपातील पेरण्या आटोपल्या आहेत. यात सर्वाधिक चार लाख १२ हजार ५६२ हेक्टरवर सोयाबीन, एक लाख ९८ हजार १३३ हेक्टरवर कपाशी, ५८ हजार ४४१ हेक्टरवर तूर, १३ हजार ३९७ हेक्टरवर उडीद, १४ हजार ४३४ हेक्टरवर मुग, सात हजार ६८३ हेक्टरवर खरीप ज्वारीची लागवड झाल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.

पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक सर्वसाधारण क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्के

सोयाबीन ३,५३,३१४ ४,१२,५६२ ११६.७७

कपाशी २,४१,२८२ १,९८,१३३ ८२.१२

तूर ६७,४२३ ५८,४४१ ८६.६५

मूग २७,३९२ १४,४३४ ५२.६९

उडीद २९,६२५ १३,३९७ ४५.२२

ज्वारी ४४,७४० ७,६८३ १७.१७

तीळ ५६५ २२३ ३९.४७

मका ८२३ ९९६ १२१.०२

एकूण ७,

नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. तालुकास्तरावरुन पेरणीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर एकूण च़ित्र स्पष्ट होईल. यंदा जिल्ह्यात एकाचवेळी सर्वत्र पेरण्या झाल्या आहेत. सध्या शेतकरी आंतरमशागतीच्या कामांत गुंतले आहेत.
भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT