Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market News : खरीप कांदा आवक सुरू; दरात तेजीची शक्यता

Onion Market Rate : खरीप लाल कांद्याचे घटलेले उत्पादन व नवीन कांद्याच्या पुरवठ्यात तूट असल्याने दरात तेजी राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

मुकुंद पिंगळे

Nashik Onion News : यंदा पाऊसमान कमी असल्याने जिल्ह्यात यंदा खरीप कांदा लागवडीत मोठी घट झाली आहे. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन खरीप लाल कांद्याच्या लिलावाला प्रारंभ होत असतो. मात्र यंदा आवक सर्वसाधारण असल्याची स्थिती आहे.

खरीप लाल कांद्याचे घटलेले उत्पादन व नवीन कांद्याच्या पुरवठ्यात तूट असल्याने दरात तेजी राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, खारी फाटा (उमराणे) येथील श्री रामेश्वर कृषी मार्केट व मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजार आवारात मुहूर्ताला प्रतिक्विंटल ११,१११ रुपये उच्चांकी दर मिळाला.

देवळा तालुक्यातील महात्मा फुले नगर येथील श्री रामेश्वर कृषी मार्केटमध्ये २१७ वाहनांमधून खरीप लाल कांद्याची ११८५ क्विंटल आवक झाली. खडकतळे (ता. देवळा) येथील कैलास तानाजी पगार यांच्या मालाला उच्चांकी ११,१११ रुपयांची बोली लागली. कांद्याला प्रतिक्विंटल किमान ५०० ते कमाल ११,१११ तर सरासरी ३,०५८ रुपये दर मिळाला.

लिलावप्रसंगी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू काका देवरे, उमराणेचे माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल, श्रीरामेश्वर कृषी मार्केटचे संचालक श्रीपाद ओस्तवाल, संचालक पुंडलिक देवरे, सचिव दौलतराव शिंदे, व्यापारी संतोष बाफना, प्रवीण बाफना, दिनेश देवरे, योगेश पगार, दीपक गांगुर्डे, चिंधू खैरे, नितीन काला, उज्ज्वल देवरे आदींसह शेतकरी, हमाल, मापारी उपस्थित होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंगसे उपबाजारात उपसभापती विनोद चव्हाण यांच्या हस्ते लिलाव झाला. मुंगसे येथील शेतकरी सुधाकर रौंदळ यांनी मुहूर्तावेळी बैलगाडीतून आणलेल्या कांद्यास सर्वोच्च ११ हजार १११ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला.

राहुल आडतचे संचालक व कांदा व्यापारी राहुल सूर्यवंशी यांनी बोली लावत ११ हजार १११ रुपये दराने नवीन खरीप लाल कांदा खरेदी केला. येथे ११९ वाहनांतून १,१९० क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल किमान १,०५० ते कमाल ११,१११ तर सरासरी ३२५० रुपये दर मिळाले.

लागवडी घटल्या; आवकही कमी

जिल्ह्यात प्रामुख्याने चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, येवला तालुक्यांत आगाप खरीप लाल कांदा लागवडी सर्वाधिक असतात. मात्र यंदा पावसाने गणित बिघडले आहे. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्ताला जिल्ह्यात नवीन लाल कांद्याची आवक सुरू होते. मात्र यंदा हे चित्र उलटे आहे. यंदा लागवडी उशिरावर गेल्याने बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांचा कांदा काढणीला आहे.

मात्र आवकेसह गुणवत्ताही जेमतेम असल्याची एकंदरीत स्थिती आहे. उन्हाळ कांद्याची प्रतवारी घडली आहे, दुसरीकडे सड होऊन साठा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे खरीप लाल कांद्याचे घटलेले उत्पादन व नवीन कांदा पुरवठ्यात तुटीमुळे दरात तेजी राहण्याची चिन्हे आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT