Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : कोकणात ४ लाख १६ हजार हेक्टरवर होणार खरीप लागवड

खरीप हंगामात कोकणासाठी ४ लाख १६ हजार हेक्टरवर लागवड होणार असून त्यात रत्नागिरी जिल्ह्यात ८० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : खरीप हंगामात कोकणासाठी ४ लाख १६ हजार हेक्टरवर लागवड होणार असून त्यात रत्नागिरी जिल्ह्यात ८० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. अल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यास कृषी विभागाकडून नियोजन (Agriculture Department Management) करावे.

१० मे पूर्वी तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत बियाणे पोहोच करावीत, अशा सूचना राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. तसेच हंगामात काम न करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तंबीही त्यांनी दिली.

दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात कोकण विभागीय खरीपपूर्व आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते.

या वेळी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, फलोत्पादन संचालक केलास मोटे, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक सुभाष नागरे, निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील, जलसंधारण संचालक रवींद्र भोसले, रत्नागिरी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे कृषी अधीक्षक उपस्थित होते.

कोकण विभाग कृषी सहसंचालक यांनी २०२२-२३ अंतर्गत कोकणातील पाचही जिल्ह्यांत राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्यानंतर खरीप हंगाम २०२३ च्यादृष्टिने कृषी विभागाचे शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या नावीन्यपूर्ण योजना राबविणार याबाबत मार्गदर्शन केले.

पारंपरिक भात बियाण्यांचे संवर्धन प्रात्यक्षिकाद्वारे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त नाचणी, वरई यांसारख्या पिकांचे प्रात्यक्षिकाद्वारे बियाणे उपलब्ध करून देऊन क्षेत्र व उत्पादकता वाढविणे, खते व बियाण्यांचे व्यवस्थित नियोजन करणे, फळबाग व लागवडीद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकणे, प्रक्रिया उद्योजगाद्वारे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी सूचना चव्हाण यांनी दिल्या.

विभागाला खरीप हंगामात १० हजार हेक्टरवर फळ लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहेत. त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना मोते यांनी दिल्या.

जिल्हा क्षेत्र (हेक्टर)

ठाणे - ५९ हजार

पालघर - १ लाख ४ हजार

रायगड - १ लाख ६ हजार

रत्नागिरी- ८० हजार

सिंधुदुर्ग - ६६ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT