Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पावसाचा जोर वाढल्याने खरीप पिकांना फटका

Team Agrowon

Solapur News : गेल्या काही दिवसाच्या विश्रांतीनंतर सोलापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार सुरवात केली असून, सोमवारी (ता. २) सलग तिसऱ्या दिवशी पहाटेपासून दिवसभर थांबून-थांबून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला.

सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. उन्हाचा कडाका वाढल्याने उष्मा जाणवत होता. पण शनिवारी (ता.३१) सायंकाळी पावसाने हलकी हजेरी लावली. त्यानंतर रविवारी (ता.१) पहाटेपासून पावसाची पुन्हा सुरवात झाली. रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरुच होती.

त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व शेतीकामे खोळंबली. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. त्यानंतर आज सोमवारी (ता.२) पाऊस विश्रांती घेईल, असे वाटत असतानाच सोमवारीही पहाटेपासून पुन्हा त्याने तोंड वर काढले.

सकाळी सात ते नऊच्या दरम्यान अनेक भागात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा अशा भागात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. तसेच दिवसभर थांबून-थांबून त्याची रिपरिप सुरुच राहिली.

शेतीकामात खोळंबा, खरीप पिकांचे नुकसान

गेल्या पंधरवड्यात पावसाने चांगली उघडीप दिल्यामुळे ग्रामीण भागात सर्वत्र मूग आणि उडदाची काढणी सुरू होती. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी चिखल असतानाही मिळेल, त्या मजुरांवर किंवा हार्वेस्टरद्वारे उडदाची काढणी उरकण्यात येत होती. पण आता हा पाऊस लागून राहिल्याने मोठा अडथळा या कामामध्ये आला आहे.

खरिपातील पिकांसाठी यापूर्वीच पुरेसा पाऊस झाला आहे. सोयाबीन, तूर ही पिके अगदी जोमात आहेत, पण आता पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास खरीप पिकांचे मोठे नुकसान होणार आहे, तर रब्बीची पेरणीही लांबणीवर जाणार आहे. सततच्या पावसाने शेतामध्ये तण वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मशागतीसाठी मोठा खर्च येणार आहे. त्याशिवाय पिकांचे नुकसानही सोसावे लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT