Soybean Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Cultivation : खरीप हंगामात सोयाबीन लागवड अधिक होणार

Kharif Soybean Sowing : खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. कृषी विभागाने बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला आहे.

Team Agrowon

Buldana News : तालुक्यात या खरीप हंगामात सोयाबीनची सर्वाधिक ३८ हजार हेक्टरपर्यंत लागवड होणार आहे. कपाशीचे १९ हजार ४६७ हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. तर तालुक्यात एकूण ६६ हजार १३०.१६ हेक्टरवर पेरणी होणार आहे.

खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. कृषी विभागाने बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही, असा दावा केला जात आहे.

तालुक्यात सोयाबीन, कपाशी आणि मका ही प्रमुख खरीप पिके असून, त्यासाठी आवश्यक बियाण्यांचे नियोजन पूर्ण झाले आहे. बियाणे व खतांसाठी कृषी विभाग सज्ज असून, बनावट व जादा दराने विक्री रोखण्यासाठी कृषी विभागांकडून भरारी पथक आणि गुणनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. बनावट बियाणे किंवा जादा दराने विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

घरगुती किंवा बाजारातील सोयाबीन बियाणे पेरणी करण्यापूर्वी शंभर बियांची उगवण क्षमता तपासून पेरणी करावी. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्या शिवाय पेरणी करू नये, परवानाधारक विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करून पक्के बिल घ्यावे, घरातील सातबाराधारकाच्या नावाने बियाणे खरेदी करावे, खरेदी केल्यानंतर टॅग, खरेदीचे बिल हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना परवानाधारक आणि अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागांकडून करण्यात आले.

...असे असेल क्षेत्र

तालुक्यात सोयाबीन पिकाची ३८ हजार १९ हेक्टर, तूर ४ हजार ७४५ हेक्टर, कपाशी १९ हजार ४६७ हेक्टर, मूग १ हजार ८४३ हेक्टर, उडीद १ हजार ७१३ हेक्टर, बाजरी ६.८० हेक्टर, मका १०४.६० हेक्टर, इतर पिके २०० हेक्टर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gorakshak Terror: गोरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?

Kharif Crop Insurance: खरीप पीकविमा अर्जासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

US Import Duty: भारतापेक्षा बांगलादेश, पाकिस्तानवर शुल्क कमी

NAFED Onion Procurement: नाफेडचा कांदा खरेदीत ‘एमएसपी’ दाव्याचा संतापजनक प्रकार

Pune Dams: जिल्ह्यातील १९ धरणांतून पाण्याचा विसर्ग

SCROLL FOR NEXT