Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Competition : खरीप हंगाम पीक स्पर्धेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Kharif Season 2025 : बुलडाणा जिल्ह्यासाठी यावर्षी मूग, उडीद, सोयाबीन, तूर, मका, बाजरी, ज्वारी, भुईमूग आणि सूर्यफूल ही पिके पिकस्पर्धेत समाविष्ट करण्यात आली आहेत.

Team Agrowon

Buldana News : शेतकऱ्यांनी नवे प्रयोग करून अधिकाधिक उत्पादन घ्यावे आणि इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान व्हावे, यासाठी कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२५साठी पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

बुलडाणा जिल्ह्यासाठी यावर्षी मूग, उडीद, सोयाबीन, तूर, मका, बाजरी, ज्वारी, भुईमूग आणि सूर्यफूल ही पिके पिकस्पर्धेत समाविष्ट करण्यात आली आहेत. या स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

स्पर्धकांनी विहित नमुन्यात अर्ज भरून, त्यासोबत सातबारा, नमुना आठ अ, चलन आणि जातप्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) जोडून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळ किंवा स्थानिक कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असेही श्री. ढगे यांनी सांगितले.

स्पर्धेच्या मुख्य अटी

 शेतकऱ्याच्या नावावर जमीन असावी व तो स्वत: ती कसत असावा.

 एका शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकांसाठी अर्ज करता येईल.

 निवडलेल्या पिकासाठी सलग ४० आर क्षेत्र असणे आवश्यक.

 सर्व अर्जदार स्पर्धेसाठी पात्र समजले जातील.

प्रवेशशुल्क

 सर्वसाधारण गटासाठी प्रति पीक ३०० रुपये,

 आदिवासी गटासाठी १५० रुपये

अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखा

 मुग व उडीद पदक ः ३१ जुलै २०२५

 सोयाबीन, तूर, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग, सूर्यफूल: ३१ ऑगस्ट २०२५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT