Water Shortage Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : पेण तालुक्यातील खारेपाट पावसाळ्यातही तहानलेलाच

Water Stock Update : पेण तालुक्‍यातील खारेपाटासह इतर काही भागात अद्याप पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. जोरदार पावसाला सुरुवात झाल्‍याने आता नागरिक पागोळीच्या पाण्याने तहान भागवत आहेत.

Team Agrowon

Raigad News : पेण तालुक्‍यातील खारेपाटासह इतर काही भागात अद्याप पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. जोरदार पावसाला सुरुवात झाल्‍याने आता नागरिक पागोळीच्या पाण्याने तहान भागवत आहेत. त्‍यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे.

तालुक्यातील कणे, काळेश्री, उर्णोली, वरप, वायिरमाल, वरप चिंचपाडी, पाबळ, कुरनाड बौद्धवाडी आदींसह शिर्की येथील आझाद वाडी, सरेभाग, हरिभाऊ वाडी, म्हसोबा वाडी या भागात पेण पंचायत समितीच्या वतीने ९ टँकर सुरू असून येत्या ३० जूनपासून ते बंद करण्यात येणार आहे.

त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरीकाना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. तालुक्यातील २३ गावे आणि ८२ वाड्या-वस्त्यांसह जवळपास १०५ गावे टंचाईग्रस्‍त आहेत. दोन दिवसांपासून पेण तालुक्यात पावसाला सुरुवात झाल्‍याने नागरिकांसह शेतकऱ्यांनी समाधान

व्यक्‍त केले आहे, मात्र गावांमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याने पावसाचे पाणी पागोळीत साठवून ठेवून त्यावर तहान भागवावी लागत आहे.

खारेपाटासह इतर गावांत उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासत असल्याने सरकारच्या वतीने टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो. सध्या ९ टॅंकर सुरू असून तेही ३० जूनला बंद करण्यात येणार आहेत. पावसाळा सुरू झाला असून विहिरींनाही पाझर फुटल्‍याने पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे.
संजय कांबळे, पाणीपुरवठा विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT