Jowar Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Dadar Jowar : दादर ज्वारीचे एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन

Jowar Harvesting : मळणी मागील आठवड्यात सुरू झाली असून, या आठवड्यात या कार्यवाहीस वेग येईल, असे दिसत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात दादर ज्वारीची मळणी वेगात सुरू आहे. एकरी आठ ते १० क्विंटल एवढे उत्पादन येत आहे. मळणी मागील आठवड्यात सुरू झाली असून, या आठवड्यात या कार्यवाहीस वेग येईल, असे दिसत आहे.

कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी खानदेशात तापी, गिरणा, पांझरा, अनेर आदी नद्यांच्या क्षेत्रात झाली होती. अनेकांनी दिवाळीच्या काळात पूर्वमशागत करून काळ्या कसदार क्षेत्रात पेरणी केली.

काही शेतकऱ्यांना सोयाबीनचे पीक घेतल्यानंतर पेरणी करायची होती, यात विलंब झाल्याने जमिनीतील वाफसा कमी झाला. यामुळे शेत भिजवून त्यात पूर्वमशागत करून दादर ज्वारीची पेरणी करण्यात आली. नोव्हेंबरमध्ये कमाल शेतकऱ्यांनी दादर ज्वारीची पेरणी केली. काही शेतकऱ्यांनी डिसेंबरमध्ये संशोधित, सुधारित प्रकारच्या दादर ज्वारी वाणांची पेरणी केली. तीन वेळेस या पिकात सिंचन करावे लागले.

काही शेतकऱ्यांना पिकात एक वेळेस फवारणीदेखील घ्यावी लागली होती. परंतु कोरडवाहू पिकात रासायनिक खतांचा कुठलाही उपयोग झालेला नाही. अनेकांनी आपल्याकडील पारंपरिक ज्वारी वाणांची पेरणी केली आहे. यामुळे फक्त पेरणी व कापणी, मळणीवर खर्च येत आहे. खते, कीडनाशके यांवरील खर्च नसल्याने पीक परवडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

डिसेंबरमध्ये पेरणी केलेले दादर ज्वारीचे पीक मळणीवर आले आहे. तर नोव्हेंबरमध्ये पेरणी केलेल्या दादर ज्वारीत मळणी सुरू आहे. कोरडवाहू दादर ज्वारीचे उत्पादन एकरी सात ते आठ क्विंटल येत आहे. तर एक वेळेस सिंचन केलेल्या काळ्या कसदार जमिनीत दादर ज्वारीचे एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन येत आहे. कसदार धान्यासह चांगला चाराही दादर ज्वारीतून उपलब्ध होत आहे. एकरी २०० पेंढ्या दादर ज्वारीचा कडबा उपलब्ध होत आहे.

मळणी २० ते २२ दिवस सुरूच राहणार

खानदेशात विविध टप्प्यांत दादर ज्वारीची पेरणी झाली आहे. यामुळे मळणी मागील महिन्यात सुरू झाली. ही मळणी पुढील २० ते २२ दिवस सुरूच राहील. यामुळे बाजारातही ज्वारीची आवक सुरूच राहणार आहे. एप्रिलमध्ये आवक अधिक होईल, असेही चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver GR: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा शासन निर्णय जारी; शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

Farm Loan Waiver GR: कर्ज २ लाखांपेक्षा जास्त असेल तर माफ होणार का?; 'एकवेळ समझोता' योजना काय आहे?

Ujani Dam Water: पाऊस लांबण्याची शक्यता; उजनीतील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव

Banana Cultivation: केळीच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे गरजेचे : शरद विसपुते

Kharif Tayari: दिंडोरी तालुक्यात कृषी विभागाकडून खरिपाची तयारी

SCROLL FOR NEXT