Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : रब्बीतील नुकसान भरपाईसाठी प्रतिक्षाच

Heavy Rainfall Loss : खानदेशात यंदाचा नवा रब्बी हंगाम सुरू होऊन आटोपण्याच्या स्थितीत आला, पण मागील वर्षातील किंवा जानेवारी २०२४ ते मार्च २०२४ या कालावधील झालेल्या नुकसानीबाबतची मदत किंवा मदतनिधी अजून अप्राप्त आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदाचा नवा रब्बी हंगाम सुरू होऊन आटोपण्याच्या स्थितीत आला, पण मागील वर्षातील किंवा जानेवारी २०२४ ते मार्च २०२४ या कालावधील झालेल्या नुकसानीबाबतची मदत किंवा मदतनिधी अजून अप्राप्त आहे.

वादळ व गारपिटीत पीक व अन्य नुकसानीसंबंधीचे पंचनामे झाले आहेत. अहवालही तयार झाले. त्यात सुमारे २३ हजार हेक्टरवरील पिकांची मोठी हानी झाली आहे. यासंबंधीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे रवाना झाला आहे. भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

खानदेशात जानेवारीतही वादळ व गारपीट, पाऊस झाला. पुढे २६ व २७ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी वादळ व गारपीट झाली. जळगाव जिल्ह्यात २६ व २७ रोजीच्या वादळात १८ हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली होती.

यानंतर १ मार्च रोजीच्या वादळी पाऊस व गारपिटीत सुमारे एक हजार हेक्टरला फटका बसला. तसेच २९ फेब्रुवारी ते १ मार्च यादरम्यान धुळे व नंदुरबारातही गारपीट, वादळी पाऊस झाला. यात धुळ्यातील शिरपूर, धुळे, साक्री भागात मोठी हानी झाली. नंदुरबारातही नुकसान झाले होते.

शिरपुरात हानी

शिरपुरातील कुवे, अर्थे, निमझरी भागात केळी, पपई, मका, गहू, हरभरा या पिकांची मोठी हानी झाली. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत खानदेशात विविध भागात गारपीट, पाऊस झाला. यामुळे हाताशी आलेला घास हिरावला गेला होता. कलिंगड, केळी, पपई या शेतमालेचे दरही खरेदीदारांनी कमी केल्याने वित्तीय नुकसान अनेकांनी त्या वेळी सहन केले.

केळीची विक्रीही कमी दरात करावी लागली होती. केळीचे दर १८०० रुपयांपर्यंत होते. कलिंगडाचे दर २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान १३ ते १४ रुपये प्रतिकिलो, असे थेट शिवार खरेदीत दिले जात होते. परंतु कलिंगडाचे दरही १० ते ११ रुपये प्रतिकिलो, असे झाले होते. पपई विक्रीतही त्या वेळी अनेकांना फटका सहन करावा लागला.

तापीकाठी हानी

जळगावातील चोपडा तालुक्यात चहार्डी, घाडवेल, सनपुले, धनवाडी, गरताड या भागात मोठी पीकहानी झाली होती. माचले, धानोरा, मंगरूळ या भागातही पिकांना मोठा फटका बसला होता. अनेक शेतकऱ्यांचे मका, ज्वारी, गव्हाचे पीक आडवे झाले होते. अनेकांच्या पिकात दाणे भरले नव्हते. किंवा दाणे बारीक पडून पीक उत्पादकतेला मोठा फटका बसला होता. या भागातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chinese Illegal Raisin: चीनच्या बेकायदा बेदाण्यामुळे शेतकरी संतप्त

Cotton Cultivation: कापूस लागवडीकडे कल, ‘एचटीबीटी’ शिरकावाची धास्ती

Kharif Crop Competition Results: पीकस्पर्धेत शेतकरी धुमाळ, गलांडे, शेख, राणे, कतकर चमकले

Wild Fruits: सिमेंटच्या जंगलात रानमेव्याचा गोडवा

Rain Crops Damages: राहू परिसराला गारांसह वादळी वाऱ्याचा तडाखा

SCROLL FOR NEXT