Tur Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Sowing : तूर लागवड किंचित वाढली

Kharif Sowing : मागील दोन वर्षे तूर लागवड सतत वाढली आहे. अनेकांनी सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तूर लागवड केली आहे. कापूस पिकातही तुरीचे आंतरपीक आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा तूर लागवड सुमारे १६ हजार २०० हेक्टरवर झाली आहे. लागवड यंदा किंचित वाढली असून, जळगाव जिल्ह्यात सुमारे १२ हजार हेक्टरवर तूर पीक आहे. जळगाव जिल्ह्यातील लागवड सुमारे एक हजार हेक्टरने अधिक आहे.

मागील दोन वर्षे तूर लागवड सतत वाढली आहे. अनेकांनी सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तूर लागवड केली आहे. कापूस पिकातही तुरीचे आंतरपीक आहे. कमी व अधिक पावसातही तूर पीक हाती आले. त्यातून चाराही आला व जमीन सुपीकतेलाही मदत झाली.

शिवाय अन्य पिकांच्या तुलनेत खर्च कमी लागला. कापूस पीक खर्चिक बनले आहे. मजूर, कीडनाशके आदींचा मोठा खर्च कापसावर करावा लागतो. यामुळे तूर लागवडीत वाढ झाली आहे.

लागवड जुलैत पूर्ण

तुरीसाठी खानदेशात जळगावातील मुक्ताईनगर, रावेर, बोदवड, जामनेर हा भाग प्रसिद्ध आहे. तसेच अन्य भागात कापूस पिकात तूर असते. धुळ्यातील धुळे, शिंदखेडा, नंदुरबारमधील नवापूर, नंदुरबार भागांतही तूर लागवड वाढली आहे.

यंदा तुरीखालील क्षेत्रात सुमारे दोन ते तीन टक्के वाढ झाल्याचा अंदाज आहे. लागवड मागील पंधरवड्यातच पूर्ण झाली आहे. अनेकांनी संकरित, संशोधित तूर वाणांची लागवड केली आहे. काही तूर वाणांचा खानदेशात तुटवडादेखील होता.

कापसाऐवजी तूर

कापूस पीक कमी करून तूर लागवडीला यंदा अनेकांनी पसंती दिली. कापसाऐवजी तुरीची लागवड अनेकांनी केली आहे. तूर लागवड मे अखेरीस व जून आणि या महिन्यातही झाली आहे. रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर भागांत अनेकांनी पूर्वहंगामी तुरीची ठिबकवर लागवड केली आहे.

तूर पीक जोमात आहे. पाऊसमान चांगले राहिल्यास सर्वत्र पीक बऱ्यापैकी येईल. पिकात अनेक भागांत दोन वेळेस आंतरमशागतही झाली आहे. तर खतेही देण्यात आली आहेत. लागवड पूर्ण झाली आहे. पुढे क्षेत्रात कोणतीही वाढ होणार नाही, अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

US Import Tarrif: आयातीचा उंट तंबूत नको

Uzi Fly Control: उझी माशीसाठी निसोलिनक्स थायमस वापर पर्यावरणपूरक

Agriculture Minister: ‘कृषी’च्या निधीसाठी आग्रह धरू : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Pannageshwar Sugar Factory: ‘पन्नगेश्वर’कडील शेतकऱ्यांची देणी कोण देणार?

Maharashtra Startup Policy: पन्नास हजार स्टार्टअप्सचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT