Health Center Agrowo
ॲग्रो विशेष

Kayakalp Award : बत्तीस आरोग्य केंद्रांना ‘कायाकल्प’ पुरस्कार

Health Center Award : २०२२-२३ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली असून नाशिक जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे.

Team Agrowon

Nashik News : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शासकीय रुग्णालयांच्या आरोग्य सुविधांच्या दर्जा वाढावा व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या या हेतूने आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्काराने गौरविण्यात येते. २०२२-२३ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली असून नाशिक जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे.

यामध्ये जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम क्रमांकाचा ‘कायाकल्प पुरस्कार’ जाहीर झाला आहे. याचसोबत जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात व आरोग्य संस्थांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या आरोग्य सुविधांमध्ये सातत्य ठेवावे, यासाठी कायाकल्प पुरस्कार योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत आरोग्य संस्थांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट उपाययोजनांच्या आधारावर पुरस्कृत करण्यात येते.

यामध्ये गुणांकन करण्यात येऊन निर्धारित मानक पूर्ण करणाऱ्या आरोग्य संस्थांना रोख रकमेचे पुरस्कार देण्यात येतात. नाशिक तालुक्यातील जातेगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रास कायाकल्प पुरस्कार जाहीर आला असून या पुरस्काराची रक्कम २ लाख रुपये आहे. इतर ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला असून या प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

तुळजापूर तालुक्यातील ३४ तलाव मृतसाठ्याखालीया आरोग्य केंद्रांचा झाला ‘कायाकल्प’ जातेगाव, तळेगाव, मोहाडी, ओझर, अंबोली, देवगाव, खामखेड, पिंपळगाव बसवंत, वडनेर खाकुर्डी, करंजाळी, निमगाव, नैताळे, लोहनेर, पांढुर्ली, सोनज, सय्यद पिंप्री, पालखेड, कनाशी, सौंदाणे, उसवड, मुखेड, दहीवड, काझीसांगवी, चिंचोली, पांडाणे, साल्हेर, तळेगाव रोही, ओतूर, वडनेर भैरव, सावरगाव, मुल्हेर, मुळवड.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमाअंतर्गत निवड केलेल्या ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये भौतिक सुविधांसह आरोग्य सुविधांचा दर्जा वाढवण्यात येत आहे. कायाकल्प उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी १८ स्मार्ट केंद्राची निवड झाली आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमाचे देखील हे यश आहे.
डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT