Onion Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Disease : कांद्यावरील जांभळा करपा

Onion : या लेखात शेतीतील हंगाम लक्षात घेऊन रोग किंवा किडीची एखाद्या ठळक छायाचित्राच्या रूपाने ओळख करून देण्यात येत आहे.

Team Agrowon

Onion Crop : शंभर शब्दांमध्ये जे बोलता येत नाही ते फक्त एक छायाचित्र सांगू शकते असे म्हटले जाते. पीक संरक्षण विषयात किडी-रोगांच्या नियंत्रणामध्ये त्यांची छायाचित्रांद्वारे ओळख हा महत्त्वाचा भाग असतो.

हेच महत्त्व लक्षात घेऊन राहुल वडघुले यांनी स्वतः टिपलेली शास्त्रीय छायाचित्रे व त्याची लक्षणे यावर आधारित मालिका दर शनिवारी सुरू करीत आहोत. यात शेतीतील हंगाम लक्षात घेऊन रोग किंवा किडीची एखाद्या ठळक छायाचित्राच्या रूपाने ओळख करून देण्यात येईल.

लेखक परिचय

राहुल यादव वडघुले हे निफाड, जि. नाशिक येथे वास्तव्यास आहेत. कृषी कीटकशास्त्र या विषयात त्यांनी एमएस्सी पदवी प्राप्त केली आहे. एका कृषी रसायन उद्योगक्षेत्रातील कंपनीत ते क्षेत्रीय विकास व्यवस्थापकपदी कार्यरत आहेत. कंपनीत सुमारे १८ वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. वाचनासह ‘फोटोग्राफी’ हा त्यांचा आवडता व अभ्यासाचा विषय आहे.

पीक संरक्षण विषयात त्यांनी असंख्य छायाचित्रे टिपली आहेत. नागपूर येथील केद्रिय कापूस संशोधन संस्थेकडून सन २०२३ चा कापूस दिनानिमित्त मित्रकीटकाच्या छायाचित्रासाठी त्यांना पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.

स ध्याचा कालावधी लक्षात घेतल्यास कांदा पिकात जांभळा करपा (Purple Blotch) या महत्त्वाच्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. हा बुरशीजन्य रोग आहे.

रोग निर्माण करणारी बुरशी : अल्टरनेरिया पोर्री (Alternaria porri)

अन्य यजमान पिके - लसूण

नुकसान क्षमता - ३० ते ५० टक्क्यांपर्यंत.

लक्षणे

जुनी पाने लवकर बळी पडतात. प्रथम पानाच्या मध्यावर पाणीदार ठिपका दिसू लागतो. या ठिपक्याचा मध्य हा पांढरट असतो आणि कडा ह्या राखेरी ते जांभळ्या रंगाच्या होतात. हा ठिपका अंडाकार आकाराचा असतो. ठिपक्याच्या खालील व वरच्या बाजूस पिवळसर भाग दिसतो.

कालांतराने जांभळ्या ठिपक्यांत एकामध्ये एक असे अंडाकार वलय तयार होतात. त्या मध्ये या बुरशीचे बीजाणू तयार होतात. असे अनेक ठिपके हळूहळू तयार होऊन संपूर्ण पान रोगग्रस्त होऊन गळून पडते. बीजोत्पादनातील कांद्यावरही हा रोग आढळतो. यात फुलांचा दांडा पडून जाऊन नुकसान होते.

रोगाचा प्रसार

बुरशी तंतूंच्या स्वरूपात जमिनीतील काडी कचरा, सेंद्रिय पदार्थ, पिकांचे अवशेष, जुन्या कांद्याचा ढीग यावर जिवंत किंवा सुप्तावस्थेत राहते. वातावरणात ८० ते ९० टक्के आर्द्रता व २० ते ३० अंश से, तापमानात बुरशीचे बीजाणू तयार होतात. ते हवा, पाणी, कीटक व मजूर यांच्याकरवी कांदा पिकावर संसर्गित होतात.

आर्द्रता जास्त असेल व पान १२ तास ओले राहत असेल किंवा वातावरणात दव असेल, तर अशावेळी बीजाणू अंकुरित होऊन रोगाचा प्रसार करतात. नंतर पानावरील बुरशी बीजाणू निर्माण करते व त्यापासून पुढील प्रादुर्भाव होतो. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे सूक्ष्मदर्शकाखाली या बुरशीचे बीजाणू पाहून रोगनिश्‍चिती करता येते.

नियंत्रण उपाय

शेतातील काडी कचरा, जुन्या पिकांचे अवशेष काढून टाकावेत.

शिफारशीप्रमाणे बुरशीनाशकांचा वापर करावा.

ट्रायकोडर्मा या मित्र बुरशीचा वापर लागवडीपूर्वी संपूर्ण शेतात करता येईल.

वारंवार एकच पीक घेणे किंवा अन्य यजमान पिके घेणे टाळावे.

राहुल वडघुले, ९८८११३५१४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer shortage : देशात खताचा साठा पुरेसा, केंद्र सरकारचा दावा; शेतकऱ्यांची मात्र खत टंचाईने कोंडी

Fruit Packaging: भारतीय फळनिहाय पॅकेजिंग पद्धती

Agriculture Minister: विद्यार्थी वसतिगृहाला कृषिमंत्र्याची अचानक भेट

Agriculture Land Document: महसूल, दिवाणी कोर्टासाठी फेरफार पत्रक

Citrus Farming: कागदी लिंबू हस्त बहराचे नियोजन

SCROLL FOR NEXT