Mango Pest : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्यांवर फुलकिडीचा मोठा प्रादुर्भाव

Mango Pest Management : कीटकनाशकांच्या फवारण्यानंतर देखील तो आटोक्यात येत नसल्यामुळे बागायतदार हैराण झाले आहेत.
Mango Pest
Mango PestAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : जिल्ह्यात आंबा पिकांवर मोठ्या प्रमाणात फुलकिडीचा (थ्रिप्स) प्रादुर्भाव वाढला आहे. कीटकनाशकांच्या फवारण्यानंतर देखील तो आटोक्यात येत नसल्यामुळे बागायतदार हैराण झाले आहेत. त्यामुळे आंबा उत्पादन हातातून निसटण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदारांमध्ये धास्ती आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हापूस आंब्यासाठी ओळखला जातो. जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील आंब्याला जगभरात मागणी आहे. देवगड, वेंगुर्ला, मालवण या तालुक्यांसह जिल्ह्यात बहुतांश भागात आंबा लागवड आहे. देवगड हापूसला देशाच्या विविध बाजारपेठांसह जगभरात मागणी असते. परंतु या वर्षी आंबा पीक थ्रीप्समुळे धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

Mango Pest
Hapus Mango Market : हापूसला दर्जानुसार हमीभाव द्या

जानेवारीतील थंडीमुळे आंब्याला चांगला मोहोर आला. मात्र या मोहोरासोबत मोठ्या प्रमाणात ‘थ्रिप्स’चा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे बागायतदारांनी कीटकनाशकांच्या फवारण्या सुरू केल्या. परंतु प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. उलट तो वाढत आहे. मोहर पूर्ण काळा पडत आहे.

देवगड तालुक्यात या किडीचे प्रमाण अधिक आहे. या भागातील उत्पादनच बागायतदारांच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे. या वर्षी पहिल्या टप्प्यात १५ ते २० टक्के, दुसऱ्या टप्प्यात २० ते २५ टक्के, तर तिसऱ्या टप्प्यात ४० ते ५० टक्के मोहर आला.

हाच मोहर किडीचा बळी ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कोणत्याच कीटकनाशकांची थ्रिप्स नियंत्रणात येत नसल्यामुळे नेमके काय करावे, हे बागायतदारांना सुचेनासे झाले आहे.=

Mango Pest
Mango Season : राजापूरमधून आंबा पेटी अहमदाबादला रवाना

वातावरणातील बदलाचा परिणाम

फुलकिडीच्या प्रादुर्भावाला वातावरणातील बदल कारणीभूत ठरले आहेत. हिवाळा संपल्यानंतर उन्हाळ्यात जाणवणारे वातावरण हिवाळ्यात जाणवू लागले. कमाल आणि किमान तापमानातील फरक याच महिन्यात वाढला. त्यामुळे प्रादुर्भाव वाढला आहे. याशिवाय अनेक बागांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या बागांचा परिणाम आजूबाजूच्या बागांवर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कधी नव्हे इतका फुलकिडीचा प्रादुर्भाव आंबा बागांवर दिसत आहे. कोणत्याच कीटकनाशकांना तो जुमानत नसल्याची स्थिती आहे. यामुळे तालुक्यातील बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.
- बाळा मुळम, आंबा बागायतदार, देवगड
कमाल आणि किमान तापमानातील फरक, ठरावीक कीटकनाशकांची सतत फवारणी यासह विविध कारणांमुळे या वर्षी आंब्यावर फुलकिडीचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करावी.
- डॉ. विजय दामोदर, फळ संशोधन उपक्रेंद, रामेश्‍वर देवगड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com