Pune News : राज्यात विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीसह महाविकास आघाडी आणि इतर राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले. यावेळी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडवली होती. यावरून राजकारण तापलेले असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आशा योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आल्याचे मान्य केले आहे. यामुळे नव्या राजकीय टीकेला जागा मिळाली आहे.
अजित पवार यांनी, आमच्या योजनांवरून विरोधकांनी टीका केली होती. आरोप केले होते. विरोधक आम्ही (महायुती) राज्याला दिवाळखोरीत काढले. राज्याला कर्जबाजारी केले. आता पगार थांबवतील. बिलं थांबवतील असे अनेक आरोप केले होते. पण आता मनात येईल त्या घोषणा मविआचे करत आहेत. हे कोठून पैसे आणणार आहेत? असा सवाल करत टीका केली होती.
यादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोफत योजनांच्या मुद्द्यावरून वक्तव्य केलं आहे. त्यांनी कर्नाटकातील काँग्रेसच्या ५ गॅरंटीमुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा पडत असल्याचे म्हटले आहे.तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा योजनांमुळे आमचा दिवाळा निघेल अशी टीका केली होती. पण आम्ही योग्य नियोजन करत असून या ५ गॅरंटी बंद होणार नाहीत, असा दावा केला आहे.
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिद्धरामय्या म्हणाले, मोदींनी स्वतः राजस्थानमध्ये विधान केले होते की, अशा मोफत योजना कर्नाटकात राबवल्या तर कर्नाटक दिवाळखोरीत निघेल. विकासकामांसाठी पैसा राहणार नाही.
पण आम्ही मे २०२३ साली सत्तेत आलो आणि पाचही गॅरंटी सुरू केल्या. यामुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा पडत आहे, मात्र आम्ही विकासकामे न थांबवता योग्य काळजी घेत असून सर्व खर्च आम्ही करत आहोत.
याआधी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी तीन आश्वासनांचा मुद्दा मांडत जे पूर्ण करता येतील त्या घ्याव्यात, असे म्हटले होते. यावरून देखील मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका करताना काँग्रेसची सरकारने खोटी आश्वासने देतात. ती आश्वासने पूर्ण केली जात नाहीत, असे म्हटले होते.
या टीकेवर सिद्धरामय्या यांनी पलटवार करतानास खर्गे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ भाजपने काढला. तर हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा सरकार अशा योजनांमुळे सरकारी अधिकाऱ्यांना पगार देऊ शकत नाहीत, असा आरोप भाजपने केला होता. जो निराधार असून काँग्रेस सत्तेतील सर्व राज्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना पगार दिला जात आहे. सुखविंदर सुखू, रेवंत रेड्डी आणि डीके शिवकुमार यांनीही ९ नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिल्याचे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.