CM Eknath Shinde : महायुतीच्या योजना चोरून बनवला वचननामा : मुख्यमंत्री शिंदे

Maharashtra Politics : राज्याच्या तिजोरीवर सर्वांत जास्त अधिकारी बळीराजाचा, शेतकऱ्यांचा आहे. ‘लाडक्या बहिणीचा’, ‘लाडक्या भावाचा’ आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : राज्याच्या तिजोरीवर सर्वांत जास्त अधिकारी बळीराजाचा, शेतकऱ्यांचा आहे. ‘लाडक्या बहिणीचा’, ‘लाडक्या भावाचा’ आहे. शेतकऱ्यांच्या साडेसात एचपीपर्यंतच्या कृषिपंपाचे वीजबिल माफ केले.

दहा कलमी कार्यक्रमात शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा तसेच लाडक्या बहिणीला दरमहा एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या योजना चोरून विरोधकांनी ‘वचननामा’ बनवला. कॉपी करून पास होता येत नाही. पंचसूत्री म्हणजे थापासूत्री आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde : परतीच्या पावसाचा धुमाकूळ; तातडीने पंचनामे करण्यासह नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

परभणी विधासभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता.९) परभणी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी जिंतूर मतदार संघातील भाजपच्या उमेदवार आमदार मेघना बोर्डीकर, माजी खासदार सुरेश जाधव, हरिभाऊ लहाने, विजय वरपुडकर, प्रताप देशमुख आदी उपस्थित होते.

CM Eknath Shinde
Maharashtra Politics : आमचा जाहीरनामा ‘जुमला’ नाही, तर आमची ‘गॅरेंटी’ : पवार

शिंदे म्हणाले, की शिवसेनेचा प्राण असलेला धनुष्यबाण काहींनी कॉँग्रेसच्या दावणीला बांधला होता. गहाण ठेवला होता. एकनाथ शिंदेंनी तो सोडवला. परभणीच्या आमदारांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. काम दमडीचे करायचे नाही आणि फक्त श्रेय लाटायचे. एवढेच काम केले.

परभणी जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेऊन विकासकामाची पर्वणी साधायची असेल तर गावकरी असलेले उमेदवार आनंद भरोसेवर विश्‍वास दाखवून त्यांना विधानसभेत पाठवा. लाडक्या बहिणींना देताना हात आखडता घेणार नाही.

माझ्या लाडक्या बहिणीला लखपती झालेले बघयाचे आहे. माझ्या लाडक्या भावांना रोजगार द्यायचा आहे. कोणी कोर्टात गेले तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ दिली जाणार नाही. विरोधक म्हणतात, की दोषी राज्यकर्त्यांना अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकू. लाडक्या बहिणी, भावासाठी तुरुंगात जावे लागेल तर आपण शंभर वेळा तुरुंगात जाऊ, असेही शिंदे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com