Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

Farmer ID : शेतीमालाच्या चुकाऱ्यासाठी काढलेली व्यापाऱ्याची रक्‍कम पोलिस व महसूलच्या पथकाकडून जप्त करण्यात आली. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन अचलपूर बाजार समितीने व्यापाऱ्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.
Indian Farmer
Indian FarmerAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : शेतीमालाच्या चुकाऱ्यासाठी काढलेली व्यापाऱ्याची रक्‍कम पोलिस व महसूलच्या पथकाकडून जप्त करण्यात आली. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन अचलपूर बाजार समितीने व्यापाऱ्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्याकामी पैसे वाटपाची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाकडून निरीक्षक तसेच भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्याबरोबरच राष्ट्रीय तसेच राज्य मार्गावर देखील तपासणी नाक्‍याच्या माध्यमातून वाहनांची झाडाझडती घेतली जात आहे.

Indian Farmer
Farmer ID : द्राक्ष व्यापाऱ्यांना ओळखपत्र देण्याची मागणी

राज्यात या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची रक्‍कम जप्तही करण्यात आली. या कारवाईचे सकारात्मक तसेच काहीसे नकारात्मक परिणामही समोर आले आहेत. अचलपूर बाजार समिती हद्दीतील एका व्यापाऱ्याने आठवडाभरापूर्वी शेतीमालाच्या चुकाऱ्याकामी स्टेट बॅंकेतून काही लाखांची रक्‍कम काढली होती.

Indian Farmer
Farmer Digital ID : भर अजून एका ओळखपत्राची...

आपल्या वाहनाने बाजार समितीकडे निघण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही रक्‍कम जप्त केली. रकमेचा स्रोत आणि वितरणाचे कारण स्पष्ट झाल्यानंतर पाच दिवसांनी ही रक्‍कम व्यापाऱ्याला परत केली. या कालावधीत व्यापाऱ्याला मानसिक त्रास सहन करावा लागला. शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यांनाही विलंब झाला.

व्यापारी, हमाल तसेच बाजार समिती कार्यक्षेत्रातील कार्यरत सर्वांनाच ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांशी कुणाचाही काही कारणावरून वाद उद्भवल्यास यद्वारे ओळख पटविणे शक्‍य होणार आहे. गैरप्रकाराला देखील आळा बसण्यास मदत होईल.
- राजेंद्र गोरले, सभापती, बाजार समिती अचलपूर, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com