Kabuli Chana Market Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Kabuli Chana : खनदेशात काबुली हरभऱ्याची मळणी मार्चअखेर होणार सुरू

Kabuli Chana Harvesting : खनदेशात मोठ्या काबुली हरभऱ्याचे उत्पादन यंदा बऱ्यापैकी येईल, अशी अपेक्षा आहे. मळणी मार्चमध्ये सुरू होईल, असे संकेत आहेत. यंदा उत्पादन एकरी सहा ते सात क्विंटल एवढे हाती येईल, अशी स्थिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खनदेशात मोठ्या काबुली हरभऱ्याचे उत्पादन यंदा बऱ्यापैकी येईल, अशी अपेक्षा आहे. मळणी मार्चमध्ये सुरू होईल, असे संकेत आहेत.
यंदा उत्पादन एकरी सहा ते सात क्विंटल एवढे हाती येईल, अशी स्थिती आहे. गेल्या हंगामात दर कमी-अधिक झाले. सध्या आवक अल्प किंवा काही बाजारांतच होत आहे.

काबुली हरभरा अनेक भागांत पक्व झाला आहे. काही भागांत मळणी पुढील महिन्यात सुरू होईल. मोठ्या काबुली (डॉलर किंवा मेक्सिकन) हरभऱ्याची पेरणी जळगाव जिल्ह्यात १० ते १२ हजार हेक्टरवर केली जाते. ही पेरणी चोपडा, यावल, रावेर भागांत अधिक असते. हरभऱ्याच्या तुलनेत काबुलीची मळणी उशिरा म्हणजेच मार्चमध्ये सुरू होते. एकरी सहा ते सात क्विंटल एवढे उत्पादन मागील वेळेस मिळाले होते.

या हरभऱ्याचे २०१९ मध्ये सर्वाधिक एकरी आठ ते नऊ क्विंटल उत्पादन मिळाले होते. मागील दोन-तीन वर्षे उत्पादन कमी-अधिक होत आहे. मध्यंतरीदेखील उत्पादन एकरी कमाल आठ क्विंटल एवढे राहिले आहे. यंदा थंडीचे दिवस कमी व ढगाळ वातावरण अधिक आहे. यामुळे उत्पादन एकरी आठ क्विंटल फारशा शेतकऱ्यांना मिळणार नाही, अशी स्थिती आहे.

नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन्ही महिन्यांत सलग दोन दिवससुद्धा किमान तापमान पाच अंश सेल्सिअसखाली गेले नाही. काही महिने १५ ते २० दिवस ढगाळ वातावरण असायचे. हरभरा पिकाला सलग थंडी हवी असते. परंतु प्रतिकूल वातावरण राहिले. मध्यम जमिनीत काबुली हरभरा पीक अधिक असते. त्याची पेरणी चोपड्यातील अनेर व तापी नदीकाठी अधिक केली जाते. या भागात सिंचन अनेकदा करावे लागते.

मागील वेळेस जूननंतर दरवाढ होईल, अशी अपेक्षा काबुली हरभरा उत्पादकांना होती. पण दरवाढ झाली नाही. या हरभऱ्यास मध्य प्रदेशातील इंदूर, गुजरातमधील बडोदा, सूरत, अहमदाबाद येथून मागणी असते. तेथील मोठे खरेदीदार शिरपूर, चोपडा येथील बाजारात संपर्क साधून या
हरभऱ्याचा पुरवठा करून घेतात. थेट किंवा शेतकऱ्यांकडे जाऊन त्याची खरेदी काही खरेदीदार करून घेतात. यामुळे काबुलीची पेरणी वाढत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease: सोलापुरात ‘लम्पी’चा संसर्ग वाढला; संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित

Maharashtra Corrupt Ministers: कलंकित, भ्रष्ट मंत्री, आमदारांची हकालपट्टी करा

Achalpur APMC Scam: अचलपूर समितीत कोट्यवधीचा बांधकाम घोटाळा

Cow Based Farming: देशात गौ आधारित कृषी पद्धतीला मिळावी चालना

Livestock Registration: ‘कृषी’ दर्जानंतर पशुपालकांच्या नोंदणीला मिळेना प्रतिसाद

SCROLL FOR NEXT