Woman Farmer  Agrowon
ॲग्रो विशेष

Woman Farmer : ग्रामीण महिलांना प्रगतीची वाट दाखविणारी ‘ज्योती’

Agri Tourism : ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच पेंच प्रकल्पालगतच्या आपल्या शेतीत कृषी पर्यटनाची संकल्पनाही साकारली आहे. यातून या नवदुर्गेने कुटुंबीयांचे अर्थकारण सक्षम करण्यावर भर दिला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : समूह स्थापन करीत त्याद्वारे महिलांमध्ये उद्योजकतेचे बीज रोवत भागीमाहरीतील (ता. सावनेर) ज्योती भोंडेकर या नवदुर्गेने पुढाकार घेतला आहे. ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच पेंच प्रकल्पालगतच्या आपल्या शेतीत कृषी पर्यटनाची संकल्पनाही साकारली आहे. यातून या नवदुर्गेने कुटुंबीयांचे अर्थकारण सक्षम करण्यावर भर दिला आहे.

भोंडेकर या महाराष्ट्र राज्य जीवन्नोती अभियान प्रभाग व ग्राम संघाच्या सचिव आहेत. यातून महिलांचे समूह तयार करून त्यांना उद्योगाचे बळ त्या देतात. त्यांनी भागेमहारीत २५ तर पेंढरी या गावात आठ समूहांची बांधणी केली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यातील ‘नवप्रभात’, ‘श्री साई’, ‘श्री गणेश’ या समूहातील महिलांनी दूग्ध व्यवसाय सुरु केला. रोज सुमारे १०० ते १२५ लिटर दुधाचे संकलन या सर्वांकडून होते. खासगी डेअरीला त्याचा पुरवठा होतो. श्री गणेश महिला स्वयंसहाय्यता समूहाने कांडप यंत्र खरेदी करून व्यवसायाला सुरवात केली.

बेसन, मिरची पावडर, हळद, मसाले यासारख्या उत्पादनाची विक्री, ब्रॅण्डिंग हा समूह करतो. कृष्णाई समूहाव्दारे मिरची, मसाले पावडरची विक्री होते. या माध्यमातून गावखेड्यातील महिलांना स्थानिकस्तरावरच रोजगार मिळाला आहे.

‘उमेद’अंतर्गत आयोजित प्रदर्शनी, मेळाव्याच्या माध्यमातून उत्पादित मालाची विक्री केली जाते. ७० ते ८० हजार रुपयांची वार्षिक उलाढाल होते.

भोंडेकर कुटुंबीयांची सहा एकर शेती आहे. दहा वर्षांपूर्वी शेतात तीन शेततळे खोदली. त्यातील पाण्याचा पिकांसह मत्स्य पालनासाठी वापर होतो. कृषी विभागाच्या अनुदानावर हे काम झाले. या तळ्यात बारमाही मत्स्यपालन केले जाते. दीड ते तीन किलोपर्यंत वजन झाल्यानंतर माशांची विक्री होते. यातून त्यांना उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत मिळाला आहे.

कृषी पर्यटन उत्पन्नाचा स्त्रोत

नवदुर्गा भोंडेकर यांनी शेतात ब्रांदाझरी कृषी पर्यटन विकसित केले आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी पाच खोल्या बांधल्या आहेत. शाकाहारी, मांसाहारी जेवणाची सोय या ठिकाणी आहे. येत्या काळात लगतच्या जलाशयातच बोटींगची सुविधा पुरविली जाणार आहे.

बचतगटातील महिलांव्दारेच पर्यटन केंद्रस्थळी खानावळ चालविली जाते. परिणामी त्यांनाही याव्दारे रोजगार मिळतो. येत्या काळात हुरडा पार्टीची संकल्पना राबविण्याचा विचार आहे. १५० कोंबड्यांचे संगोपन त्यांच्याव्दारे होते. गावरान अंड्यांची विक्री केली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT