Sugar Market Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Packing : साखरेचे ज्यूट पॅकिंग केवळ सात टक्के कारखान्यांकडून

Sugar Juite Packing : जानेवारीपासून कोटा रोखणार; केंद्राची तंबी

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

राजकुमार चौगुले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Sugar Production : कोल्हापूर ः केंद्राने वारंवार सक्‍ती करून सुद्धा कारखान्यांनी साखरेचे पॅकिंग ज्यूटच्या (ताग) पोत्‍यात करण्यास काणाडोळा केला आहे. देशातील केवळ ३३ कारखान्यांनीच हे पॅकिंग केले आहे. एकूण कारखान्यांच्या तुलनेत ७ टक्के कारखान्‍यांनीच केंद्राचा आदेश मानल्याने सार्वजनिक अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने आता कारखान्यांना सज्जड दम दिला आहे.

दरम्यान, ज्या कारखान्यांनी हे पॅकिंग केले नाही, त्यांना जानेवारी २०२५ पासून विक्रीसाठी साखर कोटाच न देण्याचा पवित्रा केंद्राने घेतला आहे. तसे पत्रच विभागाचे सचिव सुनीलकुमार स्वर्णकार यांनी कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना बुधवारी(ता.२२) दिल्‍याने कारखान्‍यांमध्ये अस्वस्‍थता पसरली आहे. पुढील हंगामाच्या प्रारंभी म्हणजे आक्‍टोबर २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधी पर्यंत कारखान्यांनी २० टक्के पॅकिंग न केल्यास जानेवारी २०२५ पासून कारखान्यांना साखर विक्री कोटाच देण्यात येणार नाही, असे या पत्रात म्हटले आहे.

केंद्र सरकारने २०२३-२४ पासून सुरू होणाऱ्या साखर हंगामात एकूण साखर उत्पादनापैकी २० टक्के साखर ज्यूटच्या पोत्यांमध्येच पॅकिंग करण्याच्या आदेश दिला आहे. कारखान्यांनी ज्यूट वापरण्याबाबतची माहिती न दिल्यास कारखान्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. कारखाने जूटची पॅकिंग वापरतात की नाही यावरही बारीक लक्ष ठेवणार असल्याचे केंद्रीय अन्न मंत्रालयाने स्पष्ट केले होते. याबाबतचे पत्र ८ जानेवारी २३, २१ डिसेंबर २३, आणि १६ जानेवारी २०२४ ला दिले होते. १७ मे २०२४ अखेर केंद्राने घेतलेल्‍या माहितीनुसार केवळ ७ टक्केच कारखान्यांनी हे पॅकिंग केल्याचे आढळले.

ज्युटच्या पिशव्या धान्य, बियाण्यांसाठी उपयुक्त आहेत, पण साखरेसाठी त्या उपयुक्त नाहीत. पर्यावरणीय आणि तांत्रिकदृष्ट्याही साखरेसाठी ज्युटच्या पिशव्या वापरणे अयोग्य असल्याची काही कारणे देत साखर उद्योगाने ज्यूट सक्‍तीला विरोध केला आहे. ही सक्ती रद्द करावी, याबाबत सातत्याने निवेदनेही दिली आहेत. पण या मागणीला स्पष्ट नकार देत सार्वजनिक अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने ज्यूटची सक्‍ती केली आहे.

शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय
केंद्राने ताग उद्योगातील कामगार व पश्‍चिम बंगाल, ओडिशा, आसाम, मेघालय, त्रिपुरा येथील ताग उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी एकूण साखरेच्या पॅकिंगपैकी २० टक्के पॅकिंग हे तागापासून तयार केलेल्या पोत्यात करावे, अशी सक्ती केली आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कोणत्याही परिस्‍थितीत हा निर्णय कारखान्यांनी स्वीकारावा, यासाठी येथून पुढेही आम्ही प्रयत्नशील राहू, असे अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या सूत्रांनी सांगितले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT