Junnar Tourism Agrowon
ॲग्रो विशेष

Junnar Tourism: जुन्नर पर्यटन आराखडा अधिवेशनात दुर्लक्षित

Tourism Plan Delayed: राज्यातील पहिला पर्यटन तालुका दर्जा मिळून सात वर्षे होऊन देखील जुन्नर तालुक्याचा अद्याप पर्यटन आराखडा तयार होण्यास विलंब झाला आहे.

गणेश कोरे

Pune News: राज्यातील पहिला पर्यटन तालुका दर्जा मिळून सात वर्षे होऊन देखील जुन्नर तालुक्याचा अद्याप पर्यटन आराखडा तयार होण्यास विलंब झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आजी-माजी आमदारांनी २ हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचे स्वप्न दाखविले, मात्र सात वर्षांनंतरही पर्यटन विकास आराखड्याच्या नावावर एक रुपयाही खर्ची पडलेला नाही.

दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात आमदार शरद सोनवणे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले नसल्याने पर्यटन विकास हा फक्त निवडणुकांसाठी दाखविलेले गाजर असल्याचे बोलले जात आहे.आमदार सोनवणे यांनी २०१८ मध्ये आमदार असताना जुन्नर पर्यटन तालुका करण्याचा निर्णय सरकारच्या मागे लागून करून घेतला.

यानंतर झालेल्या निवडणुकीत सोनवणे यांचा पराभव झाला आणि अतुल बेनके आमदार झाले. श्री. बेनके यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षात २ हजार कोटींचा जुन्नर पर्यटन विकास आराखडा करण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती स्थापन करण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीद्वारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यानुसार काही कंपन्यांनी केलेल्या आराखड्याचे सादरीकरण १८ ऑगस्ट २०२४ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नारायणगाव येथे करण्यात आले.

या सादरीकरणानंतर प्रत्येक घटकाला किती निधी लागेल आणि पर्यावरण समृद्ध असा आराखडा सादर करण्याच्या सूचना मंत्री श्री. पवार यांनी दिल्या. मात्र वर्षानंतरही यावर काम झाले नसल्याचे समोर येत आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत श्री. बेनके यांचा पराभव झाल्यानंतर, पर्यटन विकास आराखडा पुढे नेण्यासाठी आमदार सोनवणे यांनी काही बैठका घेतल्या मात्र अद्यापही हा आराखडा अधांतरी आहे.

तर नुकतेच विधानसभेचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात विविध आमदारांनी आपल्या मतदारसंघाचे प्रश्‍न मांडले. मात्र निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा असलेल्या जुन्नर पर्यटन विकास आराखड्याचे काय झाले? असा प्रश्‍न आमदार सोनवणे यांनी उपस्थित न केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

माजी आमदारांचेही दुर्लक्ष

माजी आमदार अतुल बेनके यांनी देखील त्यांचे नेते आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे जुन्नर पर्यटन विकास आराखड्याचे काय झाले? हा प्रश्‍न हिरिरीने न मांडल्याचे दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नव्या वक्तव्याने पुन्हा वाद; राजीनाम्याच्या मागणीला जोर

Khandesh Water Storage : भूगर्भातील पाणी उपसा घटला

Watermelon Farming : खरिपातील कलिंगडाची लागवड यंदा कमीच

MSP committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या हमीभाव समितीच्या नियमित बैठका; केंद्रीय कृषिमंत्र्यांचे उत्तर

Agrowon Podcast: पपईच्या दरात सुधारणा; कारली-मका तेजीत, कोथिंबीर स्थिर, तर तूर मात्र मंदीत

SCROLL FOR NEXT