Women and Child Development Minister Aditi Tatkare Agrowon
ॲग्रो विशेष

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

Minister Aditi Tatkare : मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये जून महिन्याचा सन्मान निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी (ता. ४) रात्री उशिरा अधिकृत ट्विटद्वारे दिली.

Roshan Talape

Pune News: मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये जून महिन्याचा सन्मान निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी (ता. ४) रात्री उशिरा अधिकृत ट्विटद्वारे दिली. त्यांनी ट्विटमध्ये सांगितले की, योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यांमध्ये उद्यापासून (ता. ५) निधी जमा होण्यास सुरुवात होईल.

या योजनेसाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून ४१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंत्री तटकरे यांनी या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल विश्वास व्यक्त करत म्हटले की, “महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा विश्वास यामुळे ही योजना यशस्वीपणे सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला."

दरम्यान, या योजनेत गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारने काही कठोर पावले उचलली आहेत. सरकारी नोकरी करत असलेल्या २,२८९ महिलांनी चुकीने या योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले असून, त्या सर्व महिला सरकारी कर्मचारी असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभातून वगळण्यात आल्याचेही आदिती तटकरेंनी सांगितले.

मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' ही योजना जुलै २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत महाराष्ट्रातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत थेट आधार लिंक केलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते.

हा निधी जमा झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी लाभार्थींनी काही सोपे मार्ग वापरावेत. 

UPI ॲप: तुमच्या आधार-लिंक बँक खात्याच्या UPI ॲपवर जाऊन बॅलन्स आणि ट्रान्झॅक्शन तपासा.

मोबाईल बँकिंग ॲप: तुमच्या बँकेचे मोबाईल बँकिंग ॲप वापरून खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते पाहा.

बँक शाखा भेट: जवळच्या बँक शाखेत जाऊन खात्याची माहिती आणि व्यवहार तपासा.

UMANG ॲप / PFMS पोर्टल: UMANG ॲप किंवा PFMS पोर्टल वर लॉगिन करून निधी जमा झाला आहे की नाही हे तपासता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : दसऱ्यानंतरच पाऊस ओसरणार

India-Russia Relation : भारत-अमेरिकेसाठी ‘तो’ निकष अयोग्य

Banana Market : हिंगोली जिल्ह्यात केळीचे दर गडगडले

Baramati Cleanliness : बारामती, लोणावळा, चाकण शहरे इंदूरच्याधर्तीवर स्वच्छ करणार

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT