Malegaon Sugar Factory: ‘माळेगाव’वर अजित पवार यांचीच सत्ता

Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नीलकंठेश्वर पॅनेल विजयी ठरला असून त्यांनी विरोधकांच्या गोटातील दिग्गजांना पराभूत करत सत्ता राखली आहे. ‘मी जे बोलतो ते करतो’ हे विधान पुन्हा एकदा त्यांनी खरं करत माळेगाव कारखान्याची अध्यक्षपदी आपली दावेदारी पक्की केली आहे.
Malegaon Factory Election Result
Malegaon Factory Election ResultAgrowon
Published on
Updated on

Baramati News: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरू-शिष्य समजल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे जोडीला धक्का देत कारखान्यावर एक हाती सत्ता मिळवली आहे. माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांचा फक्त विजय झाला असून माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांना धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले आहे. अजित पवार जे बोलले ते त्यांनी करून दाखविले, अशा शब्दात कार्यकर्त्यांनी भावना बोलून दाखवली.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या एकूण २१ जागांपैकी बुधवारी (ता. २५) सायंकाळी जाहीर झालेल्या निकालात चंद्रराव तावरे यांचा अपवाद वगळता इतर सर्व जागांवर नीलकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. पॅनेलच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्यानंतर प्रशासकीय भवन समोर जमलेल्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत व फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. ‘एकच वादा अजितदादा’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

Malegaon Factory Election Result
Malegaon Coopertative Election: ‘माळेगाव’ निवडणुकीमध्ये अजित पवारांचे पॅनेल आघाडीवर

निवडणुकीमध्ये श्री. पवार यांनी ‘तुम्ही माझ्याकडे बघून मतदान करा, पाच वर्षे तुम्हाला राज्यातील पहिल्या पाच क्रमांकामधील भाव देतो,’ असा शब्द दिला होता. ‘मीच कारखान्याचा अध्यक्ष असेन,’ असेही त्यांनी जाहीर केले होते, त्यांच्या या आवाहनाला सभासदांनी साथ देत त्यांच्या पॅनेलला निर्विवाद बहुमत मिळवून दिले. यामुळे आता श्री. पवार हेच माळेगाव कारखान्याचे नवीन अध्यक्ष असतील हेही स्पष्ट झाले आहे. ‘मी जे बोलतो ते करून दाखवतो,’ असे वारंवार भाषणात त्यांनी नमूद केले होते. त्यानुसार एक हाती निवडणूक लढवून दिग्गज समजल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या पॅनेलला पराभवाची धूळ चारली.

अजित पवार आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहोत हे बाजूला ठेवून ते तब्बल आठवडाभर बारामतीत थांबून वाड्या-वस्तीवर जात प्रचार केला. आणि माळेगाव कारखान्याची सत्ता त्यांनी अक्षरशः खेचून आणली. निवडणूक जिंकण्यासाठी जे काही करावे लागते ते सर्व करत आपण मुत्सद्दी आहोत, सभासददेखील पाठीशी आहेत, हेच अजित पवार यांनी सिद्ध करून दाखविले. बारामतीत आजही त्यांचाच शब्द प्रमाण आहे, मतदारसंघातील संस्थावर त्यांची मजबूत पकड आहे हे या निमित्ताने पुढे आले.

चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव व सभासदांशी असलेला संपर्क विचारात घेता पॅनेलला यश मिळेल असा सहकार बचाव पॅनेलला विश्वास होता. प्रत्यक्षात अजित पवार यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर तर केलीच शिवाय आपणच पाच वर्षे अध्यक्ष होणार हे जाहीर करत विरोधकांच्या प्रचारातील हवा काढून घेतली. सभासदांनी अजित पवारांच्या शब्दावर विश्वास ठेवून मतदान करत त्यांच्या पॅनेलला विजयापर्यंत नेऊन ठेवले. या विजयानंतर सलग दुसऱ्यांदा अजित पवार यांचेच माळेगाववर वर्चस्व असेल.

Malegaon Factory Election Result
Malegaon Karkhana Election: माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचा विजय; मतमोजणी सुरू

ब वर्ग संस्था प्रतिनिधी

अजित पवार- नीलकंठेश्वर पॅनेल- ९१

भालचंद्र देवकाते- सहकार बचाव पॅनेल- १०

भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास मतदारसंघ

विलास ऋषीकांत देवकाते- नीलकंठेश्वर पॅनेल- ८९७२ (विजयी)

सूर्याजी देवकाते- सहकार बचाव पॅनेल- ६५९८

इतर मागासप्रवर्ग

नितीन वामनराव शेंडे- नीलकंठेश्वर पॅनेल- ८४९४(विजयी)

रामचंद्र नाळे- सहकार बचाव पॅनेल- ७३४१

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग

रतनकुमार भोसले - नीलकंठेश्वर पॅनेल- ८६७० (विजयी)

बापूराव गायकवाड - सहकार बचाव पॅनेल- ७१८३

महिला राखीव प्रवर्ग

संगीता कोकरे - नीलकंठेश्वर पॅनेल- ८४४० (विजयी)

ज्योती मुलमुले - नीलकंठेश्वर पॅनेल- ७५७६ (विजयी)

राजश्री कोकरे - सहकार बचाव पॅनेल- ७४८५

सुमन गावडे – सहकार बचाव पॅनेल- ६०९९

माळेगाव गट

शिवराज जाधवराव - नीलकंठेश्वर पॅनेल- ८६१२ (विजयी)

राजेंद्र बुरुंगले- नीलकंठेश्वर पॅनेल- ८११६ (विजयी)

बाळासाहेब तावरे - नीलकंठेश्वर पॅनेल- ७९४६ (विजयी)

रंजनकुमार तावरे- सहकार बचाव पॅनेल- ७३५३

संग्राम काटे- सहकार बचाव पॅनेल- ६७०१

रमेश गोफणे- सहकार बचाव पॅनेल- ६३०२

पणदरे गट

योगेश जगताप - नीलकंठेश्वर पॅनेल- ८६३५ (विजयी)

स्वप्नील जगताप - नीलकंठेश्वर पॅनेल- ७९३३ (विजयी)

तानाजी कोकरे - नीलकंठेश्वर पॅनेल- ८४९५ (विजयी)

सत्यजित जगताप - सहकार बचाव पॅनेल- ६२३२

रणजित जगताप - सहकार बचाव पॅनेल- ६१३४

रोहन कोकरे - सहकार बचाव पॅनेल- ७०८३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com