Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Rain : सांगली जिल्ह्यात ९१ मिमी पाऊस

Monsoon Rain : दुष्काळी तालुक्यातही सरासरी इतका पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातून जून महिन्यात मुसळधार पाऊस झाला. परंतु जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या. जुलै महिन्याच्या मध्याअखेर ९१ मिलिमीटर म्हणजे ६२ टक्के इतका पाऊस झाला आहे. दुष्काळी तालुक्यातही सरासरी इतका पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात जून महिन्यात १५४.७ मिलिमीटर म्हणजे ११९ टक्के इतका पाऊस झाला. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून शिराळा तालुका वगळत इतर तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला. अधूनमधून हलका पावसाने हजेरी लावली. मात्र, शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम होता. शिराळा तालुक्यात २५ जुलै अखेर १७ दिवस पाऊस झाला. या सतरा दिवसात २८९.९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, आटपाडी, कवठेमहंकाळ, जत, तासगाव आणि खानापूर तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. जत, खानापूर, आटपाडी या तीन तालुक्यांत एक जुलै ते २५ जुलै अखेर सरासरी अनुक्रमे पाच दिवस पाऊस झाला. तर कवठेमहांकाळ तालुक्यात ११ दिवस पावसाने हजेरी लावली.

या पावसामुळे दुष्काळी तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांना उपयुक्त ठरला आहे. या पावसामुळे दुष्काळी तालुक्यातही दिलासा मिळाला आहे.गतवर्षी जुलै महिन्यात २८३ मिलिमीटर म्हणजे २०९ टक्के इतका पाऊस झाला होता. यंदा जुलै महिन्याच्या मध्याअखेर ९१.९ मिलिमीटर म्हणजे ६७.२ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अर्थात यंदा २५ जुलै अखेर १३ दिवस पाऊस झाला. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची टक्केवारी कमी होणार असल्याचे दिसते आहे.

जिल्ह्यात १ जुलै ते २५ जुलैअखेर झालेला तालुकानिहाय पाऊस (मिलीमीटरमध्ये)

तालुका पाऊस सरासरी पावसाचे दिवस

मिरज ७२.९ १०

जत ७०.६ ५

खानापूर-विटा ४३.० ५

वाळवा-इस्लामपूर ९७.२ १३

तासगाव ६१.२ १०

शिराळा २८९.९ १७

आटपाडी ८१.० ५

कवठे महांकाळ ६०.६ ११

पलूस ८६.१ ९

कडेगाव ४९.६ ७

एकूण ९१.१ १३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy: अन्वयार्थ रुपयाच्या घसरगुंडीचा!

Junnar Gold Mango: ‘जुन्नर गोल्ड’ आंब्याला ‘शेतकरी वाण’ म्हणून मान्यता

Jowar Sowing: ज्वारीचा आतापर्यंत साडेनऊ लाख हेक्टरवर पेरा

Cotton Procurement: ‘सीसीआय’ वाढविणार कापूस खरेदीची मर्यादा

Pawata Crop: भोर, हवेली, मुळशीत गावरान पावट्याचा हंगाम बहरला

SCROLL FOR NEXT