Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : सांगली जिल्ह्यातील १९ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Kharif Season : जिल्ह्यात एकूण खातेदारांची सहा लाख संख्या असून, खरीप हंगामातील शेतकरी संख्या चार लाखापर्यंत आहे. २०२४ च्या खरीप हंगामामध्ये ३ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता.

Team Agrowon

Sangli News : निसर्गाचा असमतोल, अवकाळी पाऊस, दुष्काळाच्या पार्श्वभूमीमुळे खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा काढून संरक्षित करणे आवश्यक आहे. यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत असून, १५ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सहा लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ १९ हजार ८८१ शेतकऱ्यांनी पीकविमा घेऊन १० हजार १९ हेक्टरवरील पिकांना संरक्षित केले असल्याची अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे

जिल्ह्यात एकूण खातेदारांची सहा लाख संख्या असून, खरीप हंगामातील शेतकरी संख्या चार लाखापर्यंत आहे. २०२४ च्या खरीप हंगामामध्ये ३ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. चालू खरीप हंगामामध्ये १५ जुलै २०२५ पर्यंत केवळ १९ हजार ८८१ शेतकऱ्यांनी १० हजार १९ हेक्टरचा पीकविमा उतरविला आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी पीक विम्याचे १८ लाख २६ हजार ४८६.४८ रुपये विमा कंपनीकडे भरले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पीकविमा महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना विविध पिकांचा विमा भरण्यासाठी ३१ जुलैची मुदत आहे. कृषी विभागाने विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीही केली आहे. जत तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये सहभाग घेतला आहे.

आता केवळ १४ दिवस शेतकऱ्यांना पीक विमा उतरविण्यासाठी कालावधी शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र, यंदा पीक विमा भरण्यासाठी शासनाने फार्मर आयडीसह ई-पीक पाहणी अनिवार्य केली आहे. तसेच अॅग्री स्टॅकचीही नोंदणी महत्त्वाची आहे. जिल्ह्यातील सुमारे चार लाख शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅकची नोंदणी केली आहे. अजूनही सव्वातीन लाख खातेदारांनी अॅग्रीस्टॅकची नोंदणी केली नाही.

पीकविमा उतरविलेल्या शेतकऱ्यांची संख्या

तालुका शेतकरी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

आटपाडी ९४६ ५३४.१५

जत १३५०९ ७४१२.०१

कडेगाव २१९ ६३.३७

क.महांकाळ ९८० ४१५.०४

खानापूर ८९९ ३४२.४३

मिरज ४०३ २२१.९८

पलूस १३८ ६८.७६

शिराळा १५४ ३६.१९

तासगाव २३५६ ८२५.५३

वाळवा २७७ १००.३४

एकूण १९,८८१ १०,०१९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Viral Video : राज्यातील शेतकऱ्यांनो, विसरा हमी, खेळा रमी

Onion Procurement Scam : कांदा खरेदी केंद्रांवर नियंत्रणासाठी राज्य सरकारची दक्षता समिती

Urea Shortage : युरियाची खानदेशात टंचाई

Maharashtra Assembly Session : बोजाखाली दबलेल्या सरकारची सुटका

MGNREGA Scam : मजुरांच्या खात्यात पैसे टाकणारे चौघे अटकेत

SCROLL FOR NEXT