Mumbai APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Mumbai APMC Scam : संजय पानसरे यांना न्यायालयीन कोठडी

APMC Scam News : गुन्हे शाखेने बुधवारी (ता.२४) दुपारी पानसरे व वाघ या दोघांना अटक केली होती. न्यायालयाने या दोघांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.

Team Agrowon

Pune News : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय घोटाळा प्रकरणात गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेले बाजार समितीचे संचालक संजय पानसरे व लेखाधिकारी शिवनाथ वाघ या दोघांना न्यायालयाने ९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. त्यामुळे या दोघांची शुक्रवारी (ता. २६) रात्री तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

बाजार समितीचे संचालक व अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने बाजार आवारातील विविध शौचालयांचे आपल्या मर्जीतील संस्थांना वाटप करुन तसेच त्यांचे नियमबाह्य पद्धतीने भाडे कमी करुन बाजार समितीचे तब्बल ७ कोटी ६१ लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे तपासात उघडकीस आले होते.

त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदें यांच्यासह बाजार समितीतील आजी माजी अधिकारी अशा ८ जणांविरोधात बाजार समिती पोलीस ठाण्यात फसवणूकीसह अपहार, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला होता.

गुन्हे शाखेने बुधवारी (ता.२४) दुपारी पानसरे व वाघ या दोघांना अटक केली होती. न्यायालयाने या दोघांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.

शुक्रवारी (ता. २६) या दोघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सीबीडी बेलापूर येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने या दोघांना ९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. त्यानंतर त्यांची तळोजा जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT