Pune APMC : पुणे बाजार समिती प्रशासनाकडून अडत्यांना सापत्न वागणूक

APMC News: पुणे बाजार समितीत हापूस आंब्याची आवक वाढत आहे. आवक वाढल्याने पेट्या लावण्यासाठी अडत्यांकडून अतिरिक्त जागेची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे.
Pune APMC
Pune APMCAgrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे बाजार समितीत हापूस आंब्याची आवक वाढत आहे. आवक वाढल्याने पेट्या लावण्यासाठी अडत्यांकडून अतिरिक्त जागेची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. संचालकांना बिनदिक्कत १० गुंठे जागा विनामोबदला म्हणून वापरण्यास दिली जात आहे.

मात्र सर्वसामान्य अडत्यांवर जास्तीचा शेतीमाल १५ फुटांच्या बाहेर लावल्याचे कारण देत दंडात्मक कारवाई केली जात असून, प्रशासन सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप अडते असोसिएशनचे मजी अध्यक्ष युवराज काची यांनी पत्रकार परिषदेत केला.

Pune APMC
Pune APMC : मांजरी उपबाजारातील खोतीदारांचा प्रश्‍न ऐरणीवर

फळ भाजीपाला मुख्य गेट नंबर १ च्या उजव्या बाजूला ‘थेट शेतकरी ग्राहक’ विक्रीसाठी अंदाजे दहा ते पंधरा गुंठे जागा राखून ठेवण्यात आली आहे. मात्र बाजार समितीने अडते असोसिएशनच्या अध्यक्षांना शेतीमाल विक्रीसाठी ही जागा उपलब्ध करून दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही अडत्यांकडे शेतीमाल जास्त येतो. त्यामुळे अनेकदा जागेअभावी तो शेतीमाल पंधरा फुटांच्या पुढे जातो.

Pune APMC
Pune APMC : पुणे बाजार समितीला हवा विमानतळाचा कनेक्ट

त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा दावा करत बाजार समिती १८ टक्के जीएसटीसह ५ हजार ९०० रुपयांची दंडात्मक कारवाई करत आहे. एका बाजूला बाजार समिती शेतकऱ्यांसाठी आहे, असे म्हटले जाते आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच शेतीमालाचे नुकसानही केले जात असल्याचाही आरोप काची यांनी केला. तर माझा कोणताही शेतीमाल १५ फुटांच्या बाहेर नसताना देखील दंडात्मक कारवाई केल्याचा आरोपही काची यांनी केला.

बाजार समितीकडून काही पदाधिकाऱ्यांना विशेष सवलत दिली जाते. बाजारात नवीन नवीन टपऱ्या पडत आहेत. त्या वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. शेतीमाल पंधरा फुटाच्या पुढे गेला की वाहतूक कोंडीच्या नावाखाली दंडात्मक कारवाई केली जाते. ज्यांना दहा गुंठे जागा दिली त्यांच्यावर बाजार समितीने काय कारवाई केली हे सांगायला हवे. सामान्य अडते मात्र भरडले जात आहेत. प्रशासनाच्या सापत्न वागणुकीमुळे नवीन पिढी बाजार आवारात यायला तयार नाही.
- युवराज काची, माजी उपाध्यक्ष, अडते असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com