APMC Financial Malfeasance : मुंबई बाजार समितीचे संचालक पानसरे अटकेत

APMC Market Scam : गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात असलेले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी (ता. २४) अटक केली.
APMC Market Scam
APMC Market ScamAgrowon

Pune News : गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात असलेले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी (ता. २४) अटक केली.

पानसरे यांच्यासह विविध संचालक आणि आजी-माजी अधिकारी पोलिसांच्या रडारवर असून, यामध्ये सातारा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचाही समावेश आहे. मात्र त्यांनी अटकपूर्व जामीन मिळविल्याने त्यांना अटकेपासून तूर्तास दिलासा मिळाला आहे

APMC Market Scam
APMC Market Scam : बाजार समिती शौचालय घोटाळ्याप्रकरणी संजय पानसरेंना अटक ; सात कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

बाजार आवारातील सार्वजनिक शौचालय घोटाळ्यासह विविध आर्थिक घोटाळ्याबाबत बाजार समितीच्या लेखापरीक्षणात ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणी दै. ‘सकाळ’, ‘ॲग्रोवन’ने २०१४ मध्ये वृत्तमालिकेतून गैरव्यवहार उघड केला होता.

संजय पानसरे यांनी मे. निर्मला औद्योगिक संस्थेचे मासिक भाडे ६१ हजार रुपये असताना ते ८ हजार रुपये इतके कमी करण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांची २ दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

APMC Market Scam
Pune APMC : पुणे बाजार समिती प्रशासनाकडून अडत्यांना सापत्न वागणूक

गुन्हे शाखेने या प्रकरणात सहभागी असलेल्या सुरेश मारू, मनेश पाटील व सिद्राम कटकधोंड या तिघांना अटक केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने बुधवारी पानसरे यांना अटक केली. पानसरे यांना बाजार समितीमधील प्रसाधनगृह वाटप प्रक्रियेमध्ये आर्थिक लाभ मिळाल्याचा, तसेच पानसरे व प्रसाधनगृह चालविणाऱ्या मे. निर्मला औद्योगिक संस्था यांच्यामध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

तसेच पानसरे यांचे इतर प्रसाधनगृह चालकांशीदेखील आर्थिक हितसंबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने बुधवारी पानसरे यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीअंती अटक केल्यानंतर त्यांना सीबीडी बेलापूर येथील जिल्हा व अति. सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

या प्रकरणात गुन्हे शाखेने आमदार शशिकांत शिंदे (बाजार समिती सदस्य), रवींद्र पाटील (सेवानिवृत्त तत्कालीन उपसचिव), सीताराम कावरखे, जी. एम. वाकडे (सेवानिवृत्त तत्कालीन उपसचिव), विजय शिंगाडे (उपसचिव), सुदर्शन पांडुरंग भोजनकर (उपअभियंता), राजेंद्र झुंजारराव (कनिष्ठ अभियंता), विलास पवार (कार्यालयीन अधीक्षक) या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी शिंदे यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र उर्वरित ७ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज सीबीडी बेलापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी (ता. २२) फेटाळला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com