Panjabrao Deshmukh Agriculture University Agrowon
ॲग्रो विशेष

‘पंदेकृवि’चे ज्वारी संशोधन केंद्र राष्ट्रीय स्तरावर ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’

नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय समन्वयीत ज्वारी संशोधन प्रकल्पाच्या ५२ व्या आढावा बैठकीत येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ज्वारी संशोधन केंद्रास भरीव कामगिरीसाठी ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’ पुरस्कार देण्यात आला.

टीम ॲग्रोवन

अकोला : नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय समन्वयीत ज्वारी संशोधन प्रकल्पाच्या ५२ व्या आढावा बैठकीत येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ज्वारी संशोधन केंद्रास भरीव कामगिरीसाठी ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’ पुरस्कार देण्यात आला. हा ज्वारी केंद्रातील मागील काळातील भरीव व उत्कृष्ट संशोधनाबद्दल अखिल भारतीय समन्वयीत ज्वारी संशोधन प्रकल्प व अखिल भारतीय तृणधान्य संशोधन संस्था (हैदराबाद) यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

आढावा बैठकीस कृषी संशोधन परिषदेचे महानिर्देशक डॉ. त्रिलोचन महापात्रा, उपमहानिर्देशक डॉ. टी. आर. शर्मा, सहायक निर्देशक डॉ. आर. के. सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. महापात्रा यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्यासह ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. रामेश्‍वर घोराडे आणि त्यांच्या संशोधन चमूचे अभिनंदन केले.

हा पुरस्कार या केंद्रा याआधी सुद्धा २०१४ मध्ये प्राप्त झाला होता. या ज्वारी संशोधन केंद्राने आतापर्यंत एकूण १४ विविध संकरित व सरळ वाण राज्य तथा राष्ट्रीय स्तरावर प्रसारित केले असून या पिकासंबंधी संशोधन तंत्रामध्ये विविध शिफारशी दिल्या आहेत. या केंद्राद्वारे प्रसारित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. या केंद्राने आतापर्यंत एकूण १० विविध वाणांचे शेतकरी हक्क प्रसारण समितीद्वारे नोंदणी केली आहे. संशोधनामध्ये एकूण २० वेगवेगळ्या जनुकीय वंशाची (जेनेटिक स्टॉक्स) नोंदणी राष्ट्रीय स्तरावर पादप (एन. बी. पी. जी. आर.) द्वारे करण्यात आली आहे. सदर केंद्राने कुलगुरू डॉ. भाले यांच्या मार्गदर्शनात विस्तार क्षेत्रात भरीव कामगिरी म्हणून खारपण पट्यात मोठ्या प्रमाणात प्रात्याक्षिकांचे आयोजन करून रब्बी हंगामामध्ये ज्वारी पिकाचा पर्याय उपलब्ध करून दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Poverty Crisis: व्यवस्थेने लादलेली गरीबी

Indian Agriculture: शेतीचे सामर्थ्य

Water Conservation: लोकसहभागातून जलसंवर्धनाची चळवळ उभी करा : नितीन गडकरी

Agri Input Controversy: निविष्ठा कंपन्यांच्या माहितीची दडवणूक

Soybean Productivity Decline: बुलडाण्यात सोयाबीनच्या घटत्या उत्पादकतेमुळे शेतकऱ्यांना चिंता

SCROLL FOR NEXT