Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : जिंतूर तालुक्यात ९७ हजार ४६९ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Kharif Season 2025 : तालुक्यात मूग उडीद पीक पेरणी क्षेत्रात काहीशी वाढ होऊ शकते. बोरी व आडगाव मंडळात हळद लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात यंदाच्या (२०२५) खरिप हंगामात ९७ हजार ४६९ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. सोयाबीनचे १५ हजार क्विंटल बियाणे तर कपाशीच्या ७० हजार ३८५ बियाणे पाकिटाची गरज आहे. तालुक्यात मूग उडीद पीक पेरणी क्षेत्रात काहीशी वाढ होऊ शकते.

बोरी व आडगाव मंडळात हळद लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. १२५ गावांमध्ये खरीप हंगामपूर्व नियोजन मोहीम राबविण्यात आल्या, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण शिंदे यांनी दिली.

जिंतूर तालुक्यातील खरिपाचे सरासरी क्षेत्र ९८ हजार १० हेक्टर आहे. यंदाच्या प्रस्तावित पेरणी क्षेत्रात सोयाबीन ५७ हजार २६२ हेक्टर, कपाशी २८ हजार १५४ हेक्टर, तूर ९ हजार८४० हेक्टर, मूग ६२५ हेक्टर, उडीद १९६ हेक्टर या पिकांचा समावेश आहे. सोयाबीन बियाणे बदल दर ३५ टक्के विचारात घेता १५ हजार २८ क्विंटल बियाण्याचे गरज आहे. महाबीज व खाजगी कंपन्यांकडून पुरवठा होत आहे.

शेतकऱ्यांनी मागील वर्षाच्या घरच्या बियाण्याची उगवणक्षमता तपासून वापर केल्यास खर्चात बचत होईल. महाकृषी ॲपच्या माध्यमातून कृषी विषयक विविध मोहिमा, प्रात्यक्षिके, प्रशिक्षण राबविण्यात येत आहे.

त्यात बीज प्रक्रिया मोहीम, बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक, बीबीएफ-मूलस्थानी जलसंधारण-पट्टा पेर पद्धत, जमीन सुपीकता निर्देशांक आधारे खताचा वापर, प्रतिगाव एक व्हाट्सअप ग्रुप स्थापन करणे, माती परीक्षण मोहीम व जमीन आरोग्य पत्रिका वाटप, प्रमुख खरीप पिकांच्या तंत्रज्ञान प्रसारासाठी गावनिहाय बैठकांचे आयोजन, कृषी निविष्ठांच्या वाजवी वापराबाबत जनजागृती मोहीम, हिरवळीच्या खताची निर्मिती व वापर,गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन मोहीम,हुमनी किडनियंत्रण मोहीम, शंखी गोगलगाय निर्मला जनजागृती मोहीम, शेती शाळा, विकसित कृषी संकल्प अभियान मोहिमेचा समावेश आहे.

आजवर १२५ गावांमध्ये २५५ खरीप हंगाम पूर्व नियोजन बाबतच्या मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. बियाणे खते साठा व भाव फलक दर्शनी भागात लावणे शेतकऱ्यांसाठी दुकानाबाहेर टोल फ्री नंबर १८००२३३४००० लावण्याबाबत कृषी केंद्रांना निर्देश देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना रास्त दराने व गुणवत्तापूर्ण निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथक तसेच कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कृषी सेवा केंद्रावरील खतांच्या उपलब्धतेच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषक ॲप डाऊनलोड करून वापर करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पूरस्थितीचा आढावा; अतिरिक्त १ हजार ६०० कोटींची मदत जाहीर

Agriculture Technology: धान्य साठवणुकीतून नफ्याचे गवसले तंत्र

Cotton Import Duty: कापूस उत्पादकांच्या अस्तित्वावर घाला

Dragon Fruit Benefits: क्षेत्र वाढते, जाणीव-जागृती वाढवा

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

SCROLL FOR NEXT