Water Canal  Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Canal : जायकवाडी डाव्या कालव्याच्या पाणी आवर्तनाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Jayakwadi Dam : परभणी जिल्ह्यात, रब्बी पेरणी, ऊस लागवडीसाठी पाण्याची गरज

Team Agrowon

Parbhani News : परभणी ः पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे यंदाच्या (२०२४-२५) रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पाणी आवर्तने मिळणार आहेत. परंतु कालवा सल्लागार समितीची बैठक न झाल्यामुळे अद्याप पाणीआवर्तनाची संख्या आणि वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

रब्बी पिकांच्या पेरणीसाठी तसेच ऊस लागवडीसाठी पाण्याची गरज असलेले शेतकरी पाणी आवर्तनाच्या प्रतीक्षेत आहेत. परभणी जिल्ह्यात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचे सर्वाधिक लाभक्षेत्र आहे. जिल्ह्यात डाव्या कालव्याची (मुख्य कालवा) एकूण लांबी ८६ किलोमीटर आहे. पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा, गंगाखेड तालुक्यांत कालव्याच्या वितरण प्रणाली अंतर्गत उपकालवे, वितरिका, चाऱ्याचे जाळे आहे. लाभक्षेत्रात एकूण ९७ हजार ४०० हेक्टर क्षेत्र सिंचन क्षमता आहे.

जायकवाडी धरणातील पाणीसाठ्याच्या उपलब्धता तसेच शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन डाव्या कालव्याव्दारे सर्वसाधारणपणे खरिपात ३, रब्बी हंगामात ५, उन्हाळी हंगामात ७ पाणी आवर्तने सोडण्याचे नियोजन असते. २०२२ मध्ये ता. १८ नोव्हेंबरला पहिले रब्बी आवर्तन सुरू झाले होते. गतवर्षी २०२३ धरणात पुरेसा पाणीसाठा नव्हता.त्यामुळे रब्बीत नियमित आवर्तने सोडण्यात आली नव्हती.

यंदा जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे डाव्या व उजव्या कालव्याद्वारे रब्बी तसेच उन्हाळी हंगामासाठी पाणी आवर्तने मिळणार हे निश्‍चित आहे. परंतु कालवा सल्लागार समितीची बैठक न झाल्यामुळे आवर्तनाची संख्या तसेच वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. विधानसभा निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे अधिकारी स्तरावर कालवा सल्लागार समितीची बैठक होऊ शकते. यंदा रब्बी हंगामात चार आणि उन्हाळी हंगामात पाच अशी एकूण नऊ पाणी आवर्तने सोडण्याचे प्रस्तावित आहेत. जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या असे सूत्रांनी सांगितले.

निम्न दुधना तसेच मध्यम प्रकल्पाच्या पाणीआवर्तनाची प्रतीक्षा...

परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे लाभक्षेत्र सेलू, मानवत, जिंतूर, परभणी तालुक्यात आहे. या धरणात सध्या ७४ टक्केपाणीसाठा आहे. रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांसाठी आवर्तने सोडली जातील. पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे निवळी (ता. जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्प तसेच गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्प तसेच २२ लघू सिंचन तलावांद्वारे देखील यंदा रब्बी व उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी पाणी आवर्तने मिळू शकतात. परंतु कालवा सल्लागार समितीची बैठक न झाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cooperative Development Project : सहवीजनिर्मिती प्रकल्प फायदेशीर

Supreme Court Order : शरद पवार यांचे फोटो, व्हिडिओ वापरू नका

Rabi Sowing : रब्बीच्या २९ टक्के पेरण्या

Bird Species : वायंगणीत पक्ष्यांच्या नव्वद प्रजाती आढळल्या

Silk Industry Loan : रेशीम उद्योगासाठी कर्ज मिळणार

SCROLL FOR NEXT