Sangli Drought Condition agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Drought Condition : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुके वगळल्याने तहसिलदारांचे वाहन फोडले, जयंत पाटलांचीही टीका

Jayant Patil : दुष्काळ जाहीर करताना शासनाने लावलेल्या निकषांमुळे सांगली जिल्हयातील जत, कवठे महाकाळ, वाळवा, तासगाव या ५ तालुक्यांचा विचार केला नाही.

sandeep Shirguppe

Maharashtra Drought Condition : राज्य सरकारकडून काल (ता. ३१) राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केले यामध्ये सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला वगळण्यात आल्याने तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. सांगली जिल्ह्यात सर्वाधीक जत तालुक्याला झळा बसत असुनही वगळण्यात आल्याने जत तालुक्याच्या तहसिलदारांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केली. यामुळे वातावरण काही काळ तणावाचे वातावरण बनले होते. याचबरोबर आमदार जयंत पाटील यांनीही जत तालुक्याला वगळू नये असे वक्तव्य केले आहे.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, दुष्काळ जाहीर करताना शासनाने लावलेल्या निकषांमुळे सांगली जिल्हयातील जत, कवठे महाकाळ, वाळवा, तासगाव या ५ तालुक्यांचा विचार केला नाही. मुळात ज्या ठिकाणी शेतकरी हवादिल आहे त्याच तालुक्यांचा दुष्काळ जाहीर झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शासनाने तात्काळ निकष बदलून संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली.

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात मिरज, शिराळा, खानापूर, कडेगाव या ४ तालुक्यांचा समावेश केला. सर्वाधिक झळा बसत असलेल्या जत, कवठे महंकाळ, तासगाव, आटपाडी हे दुष्काळी तालुके वगळण्यात आल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.

वास्तवीक यावर्षी संपूर्ण जिल्ह्यातच पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. कोरडवाहू शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी कुटूंबांची अवस्था तर बिकटच आहे. अशा परस्थितीत शासनाने सर्वच शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.

जत तालुक्यातील ६५ गावांना अद्याप पाणीच मिळाले नाही. यावर्षी तर पाऊसच कमी झाल्याने परस्थिती गंभीर आहे. जतसह आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस, वाळवा या तालुक्यातही सरासरीपेक्षा फारच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांचाही दुष्काळी तालुक्यात समावेश होणे गरजेचे आहे.

दुष्काळ जाहीर करताना शासनाने जे निकष लावले आहेत, त्यामुळे कदाचीत हे तालुके दुष्काळी यादीत समाविष्ट झाले नसतील. त्यामुळे शासनाने तातडीने निकष बदलून संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा. अन्यथा शेतकऱ्यांच्यात उद्रेक होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT