Bank Loan Recovery Agrowon
ॲग्रो विशेष

Loan Recovery : जत तालुका कर्ज वसुलीचे उद्दिष्ट ८० टक्के ; शिवाजीराव वाघ : जूनअखेर वसूल करा, बक्षीस मिळवा

Crop Loan : सांगली जिल्हा बॅंक प्रशासनाने जूनच्या कर्जवसुलीसाठी आतापासूनच कामाला लागले आहे. जत तालुक्याची वसुली कमी आहे. जूनअखेरची ८० टक्‍ंक्यावर वसुलीचे उद्दिष्ट अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

Team Agrowon

Sangali News : सांगली ः जिल्हा बॅंक प्रशासनाने जूनच्या कर्जवसुलीसाठी आतापासूनच कामाला लागले आहे. जत तालुक्याची वसुली कमी आहे. जूनअखेरची ८० टक्‍ंक्यावर वसुलीचे उद्दिष्ट अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, अशी माहिती बँक मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली. जूनअखेर वसुली करून बक्षीस मिळवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जत तालुक्याची १८८ कोटी इतकी वसुली तर ८३ कोटी जुनी थकबाकी आहे. जूनअखेर जास्तीत-जास्त थकबाकी वसुलीसाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जून अखेर चालू शंभर टक्के तर जुनी ५० टक्के थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. उद्दिष्टाप्रमाणे तालुक्याची ८० टक्‍क्यांवर वसुली झाली तर शेतीकर्जाचा फक्त २५ कोटी रुपयेच एनपीए राहील.

बँकेचा एनपीए कमी करण्याचा प्रयत्न आहे. बिगर शेतीचा ४७२ कोटी इतका एनपीए असून चालू वर्षांत तो निम्यापेक्षा खाली येईल. बँकेच्या ताब्यात असलेल्या सूतगिरण्यांच्या विक्रीसाठी लिलाव प्रक्रिया करण्यात येत असून यातूनही बऱ्यापैकी एनपीए कमी होईल. बँकेच्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्यांकडील थकबाकीबाबतही कार्यवाही सुरू आहे.
.

तर एक लाखाचे बक्षीस; सीईओ वाघ
जत तालुका दुष्काळी भाग असल्याने पीक कर्ज वसुलीबाबत कायमच अडचणी निर्माण झाल्या, यातूनही बँकेने शेतकऱ्यांना कोणताही त्रास न करता, तसेच वेळेवर कर्ज भरल्यास होणाऱ्या फायद्याची माहिती दिल्याने यंदा वसुलीला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रथमच तालुक्याची ४० टक्‍क्यांवर वसुली गेली आहे.

जूनच्या वसुलीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी जुनी आणि चालू अशी ८० टक्‍क्यांवर वसुली नेण्याचे उद्दिष्ट घेतले आहे. ते पूर्ण केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना एक लाखाचे बँकेकडून बक्षीस देण्यात येईल, अशी माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT