Manoj Jarange Patil  Agrowon
ॲग्रो विशेष

Manoj Jarange Patil: जरांगे पाटील यांचे उपोषण सहाव्या दिवशी स्थगित

Hunger Strike Adjournment: अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून (ता. २५) सुरू केलेले उपोषण गुरुवारी (ता. ३०) सहाव्या दिवशी स्थगित केले.

Team Agrowon

Jalna News: अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून (ता. २५) सुरू केलेले उपोषण गुरुवारी (ता. ३०) सहाव्या दिवशी स्थगित केले. मनोज जरांगे यांच्या आठ मागण्या होत्या त्यापैकी चार मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे सांगितले.

शक्यतो या पुढे उपोषण करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस हे आमच्याशी गद्दारी करतात का पाहायचे आहे. मागण्या मंजूर झाल्या नाहीत, तर मुंबईला मोर्चा नेणार असा इशारा या वेळी जरांगे पाटील यांनी दिला.

सरकारचे प्रतिनिधी म्हणून खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळुके, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक अजय बन्सल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, सिव्हिल सर्जन डॉ. राजेंद्र पाटील, तहसीलदार विजय चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी आमदार धस यांनी सांगितले, की मनोज जरांगे यांच्या आठ मागण्या होत्या त्या पैकी चार मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक आहेत. ज्यामध्ये माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीला एक वर्षाची मुदतवाढ देणे, राज्यात कुणबी नोंदी शोधून काढणे, गॅझेट तपासून त्याचा अहवाल घेऊन कार्यवाही करणे, दाखल गुन्हे उच्च न्यायालयाकडून विचारून, तपासून, मागे घेण्याची प्रक्रिया करण्यात येईल, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा तालुका स्थरावर कार्यवाही चालू करण्यात येईल, यासाठी शासन व मुख्यमंत्री सकारात्मक आहेत.

त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, की आरक्षणाकरिता दीड वर्षापासून लढा सुरू आहे. शासनाने शिंदे समितीचे काम सुरू करावे, कुणबी नोंदीसाठी कक्ष स्थापन करावेत, राज्यात दाखल सरसकट गुन्हे मागे घ्यावेत, गृह मंत्रालय यांनी लक्ष द्यावे, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी. सगेसोयरे कायद्याची अमलबजावणी व मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर मुंबईला मोर्चा नेऊ. शक्यतो या पुढे उपोषण करणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस हे गद्दारी करणार नाहीत अशी अपेक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT