Jaltara Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

'Jaltara' Yojna : ‘जलतारा’, ‘शेततळे’ शेतकऱ्यांसाठी लाभदायक

Irrigation Scheme : पाणी भूगर्भात जिरवण्याकरता ‘जलतारा’, तर शेत शिवार, तसेच मत्स्यसंवर्धनाच्या हेतूने ‘शेततळे’ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी विजया जाधव यांनी केले आहे.

Team Agrowon

Mumbai News : पालघर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असतानाही उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष बहुतांश भागात दिसून येते.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी जल पूर्णभरण आणि जलसंधारण कामांची आवश्यकता पाहता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पाणी भूगर्भात जिरवण्याकरता ‘जलतारा’, तर शेत शिवार, तसेच मत्स्यसंवर्धनाच्या हेतूने ‘शेततळे’ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी विजया जाधव यांनी केले आहे.

रोजगार हमी योजनेंतर्गत २६६ कामे असून ‘जलतारा’ आणि ‘शेततळे’ या कामांच्या माध्यमातून गावांसोबतच लोकांचाही विकास शक्य आहे. डहाणूतील हळदपाडा ग्रुप ग्रामपंचायत, तर पालघर तालुक्यातील टेन ग्रामपंचायत परिसरात पाणी भूगर्भात मुरवण्यासाठी ‘जलतारा’ आणि शेत शिवार, तसेच मत्स्यसंवर्धनासाठी शेततळे खोदण्याची कामे सुरू आहेत.

जलतारा योजनेकरिता १०० टक्के अनुदान दिले जाते. शेततळे १०० टक्के मजुरांमार्फत खोदल्यास अंदाजे पावणेदोन लाख ते साडेपाच लाख रुपये योजनेच्या माध्यमातून दिले जातात, असे जाधव यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT