Agriculture Irrigation Scheme : पाथर्डी, जामखेडच्या गटविकास अधिकाऱ्यांसह १३ जणांना नोटिसा

Rohyo Well Scheme Irregularities : रोहयो योजनेतील सिंचन विहीर मंजूर करताना अनियमितता झाल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला होता. त्यावरून या नोटिसा काढल्या आहेत.
Well Scheme
Well SchemeAgrowon

Nagar News : पाथर्डी आणि जामखेड तालुक्यांतील ‘बीडीओं’ना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. रोहयो योजनेतील सिंचन विहीर मंजूर करताना अनियमितता झाल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला होता. त्यावरून या नोटिसा काढल्या आहेत. संबंधित ‘बीडीओं’ना याबाबत दहा दिवसांत अहवाल द्यायचा आहे.

Well Scheme
Well Approval : पाणीटंचाई निवारण्यासाठी ६१ विंधन विहिरींना मंजुरी

पाथर्डी आणि जामखेड तालुक्यांतील रोहयो योजनेतून विहीर मंजूर करताना मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता. त्यावरून काही जणांनी जिल्हा परिषदेकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली होती. त्यांनी या दोन्ही तालुक्यांतील मंजूर विहिरींचे प्रस्ताव तपासले असता त्यांना काही त्रुटी आढळल्या.

त्यावरून त्यांनी ‘सीईओं’ना तसा अहवाल पाठविला. लाभार्थ्यांचे क्षेत्र नियमात बसत नसतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या विहिरीस मंजुरी दिली. खुल्या वर्गातील लाभार्थ्यांचे क्षेत्र जास्त असतानाही त्याला विहीर मंजूर झाल्याचे प्रस्ताव आढळून आले. काहींनी जुनी विहीर असतानाही नव्याने प्रस्ताव केल्याचे समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Well Scheme
Acquisition of Well : यवतमाळ जिल्ह्यात सात खासगी विहिरींचे अधिग्रहण

गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तांत्रिक अधिकारी आदीं १३ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. कर्जत तालुक्यातींल मंजूर विहिरींचे कार्यारंभ आदेश दिले जात नव्हते. त्याबाबत सुनील यादव यांनी या विहिरींचे काम सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु ‘सीईओं’नी मंजूर प्रस्तावांच्या तपासणीचे आदेश दिले.

अनियमितता की त्रुटी?

एखाद्या योजनेतून प्रस्ताव मंजूर करताना शासनाच्या नियमांचा आधार घेतला जातो. काही प्रस्तावांना चुकून आराखडा जोडायचा राहिलेला असतो. काही शेतकरी संयुक्त प्रस्ताव तयार करतात. त्या वेळी ४० गुंठ्यांपेक्षा क्षेत्र कमी असले तरी नियमांच्या आधारे तो प्रस्ताव ग्राह्य धरला जातो. त्यासाठी संबंधितांचे पाणीवाटपाचे करारपत्रक जोडायचे असते. चौकशी समितीला प्रस्तावात काही कागदपत्र अपूर्ण राहिल्याचे आढळले असेल. परंतु ती अनियमितता नाही तर त्रुटी आहे. अपूर्ण प्रस्ताव पूर्ण करता येऊ शकतात, असे प्रशासनातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com