Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Alert : जळकोटला पावसाने झोडपले

Rain Update : शहर व तालुक्याला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Jalkot News : शहर व तालुक्याला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारी अनेक ठिकाणी वावरात पाणी साचल्याचे चित्र होते. तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने अधून मधून झोडपणे सुरूच ठेवल्याने अनेक गावात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

होकर्णा, वांजरवाडा, वडगाव या परिसरात मध्यंतरी १६ आॅगस्टला ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने पिकांचे व जमिनीचे नुकसान झाले. खासदार डाॅ. शिवाजीराव काळगे तसेच मंत्री संजय बनसोडे यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांनी पाहणीही केली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार नुकसानीच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाल्याची माहिती नायब तहसीलदार पी.बी. कुडदे यांनी दिली आहे.

बुधवारी सायंकाळी डोंगरगाव, मरसांगवी भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. रस्ते खचले अशी माहिती डोंगरगावचे शेतकरी माधव सातापुरे यांनी दिली. दोन्ही वेळेस अनेक ठिकाणी पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तालुक्यात नुकसानीची माहिती घेतली जात असून अहवाल वरिष्ठांना पाठवला जाणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी सांगितले. शुक्रवारी (ता.२३) रात्री दहाच्या सुमारास शहरासह तालुक्याला मुसळधार पुन्हा पावसाने झोडपले.

जळकोटमध्ये ८१ मिमी

शुक्रवारी पडलेल्या पावसाची जळकोट तहसील कार्यालयातील पर्जन्यमापक केंद्रावर ८१ मिमी तर घोणसी पर्जन्यमापक केंद्रावर २७ मिमी नोंद झाली असल्याचे तहसील कार्यालयातून शंकर सूर्यवंशी यांनी सांगितले.

मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले. आठ एकर कापूस असून त्यातील तीन एकरमध्ये पाणी साचले आहे. तर मोसंबी बागेत फळांचा सडा पडला आहे.
अमृत केंद्रे, शेतकरी, उमरगा रेतू

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT