Drought Condition : पर्जन्यमापक यंत्रांअभावी दुष्काळ असूनही फटका

Weather Station : नांदगाव, जि. नाशिक : दुष्काळी व पुरेशा प्रमाणात पाऊस झालेल्या गावांना सरसकट एकाच तराजूत मोजण्याच्या कार्यपद्धतीचा फटका तालुक्यातील बाणगाव, भार्डी व न्यायडोंगरी या महसूल मंडळांना बसला आहे.
Weather Station
Weather StationAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Nashik News : नांदगाव, जि. नाशिक : दुष्काळी व पुरेशा प्रमाणात पाऊस झालेल्या गावांना सरसकट एकाच तराजूत मोजण्याच्या कार्यपद्धतीचा फटका तालुक्यातील बाणगाव, भार्डी व न्यायडोंगरी या महसूल मंडळांना बसला आहे.

तालुक्यात दुष्काळाची सर्वत्र भीषणता असूनही केवळ पर्जन्यमापक सुविधा नादुरुस्त असणे अथवा नसावी असे गृहित धरूनच जाहीर करण्यात आलेल्या महसूल मंडलांतून बाणगाव, भार्डी व न्यायडोंगरीला वगळण्यात आले आहे.

दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील महसूली सज्जाची पुनर्रचना करताना चारऐवजी आठ महसुली मंडले अस्तित्वात आली तर सज्जाची संख्या ४५ वर गेली. एकेका तलाठ्याचा अतिरिक्त भार कमी होऊन महसूली कामकाजात सुसूत्रता येणे अपेक्षित होते.

तालुक्यात महसूल व कृषी विभागाकडील असलेली पर्जन्यमापक यंत्रणा व त्यातील नोंदीमध्ये कायम तफावत असते. २०१८ ला देखील दुष्काळाच्या काळात असाच पर्जन्यमापनाचा गोंधळ उडाला होता. त्याची पुनरावृत्ती पुन्हा दिसून आली.

नांदगाव मंडलात असलेले बाणगाव नव्याने मंडल झाले आहे. वेहळगावमधून न्यायडोंगरी तर हिसवळमधून भार्डी तयार झाले. कागदावर महसुली मंडले आली, मात्र या मंडलांना पर्जन्यमापन यंत्रच दिले गेले नाहीत.

दोन महिन्यांपूर्वी बाणगाव व न्यायडोंगरीला पर्जन्यमापन यंत्रे मिळाली तर भार्डीला अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे पावसाचा डेटा संकलित झाला नाही. त्यामुळे दुष्काळसदृश यादीत देखील समावेश होऊ शकला नाही.

Weather Station
Weather Station : हवामान केंद्राचे फायदे काय आहेत?

वास्तविक, एप्रिलमध्ये ज्या गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आणि ज्या गावांना एरवी कायम टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, त्या बाणगाव पंचक्रोशीतील गावे दुष्काळसदृशतेच्या यादीतूनही निसटल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

कागदी सोपस्कार म्हणजे कर्तव्यपूर्ती मानून प्रशासकीय कारभाराचा गाडा हाकणाऱ्या संबंधितांचे पितळ महेंद्र बोरसे यांच्या बेमुदत उपोषणकाळात उघडे पडले होते. सरसकट दुष्काळाच्या दाहकतेत होरपळणाऱ्या तालुक्याच्या महसुली मंडलांत आठही मंडळे येणे आवश्यक आहे. मात्र ती आली नाहीत. त्याचा फटका आता जनतेला सहन करावा लागत आहे.


दुष्काळाच्या प्रश्नावर आता मंडलनिहाय उपोषणे करण्याची वेळ आली आहे. वगळण्यात आल्याच्या प्रकारानंतर बाणगाव भागातील जनता प्रशासनावर संतापली आहे. उपोषणे, आंदोलने केल्याशिवाय काहीच द्यायचे नाही, हे प्रशासनाच्या अंगवळणी पडले आहे.
- बापूसाहेब कवडे, ज्येष्ठ नेते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com