Zilha Parishad Budget
Zilha Parishad Budget Agrowon
ॲग्रो विशेष

Zilha Parishad Budget : ‘झेडपी’चा ३३ कोटी ८० लाखांचा अर्थसंकल्प मंजूर

Team Agrowon

Jalgaon Zilha Parishad : जिल्हा परिषदेकडून गेल्या काही दिवसापासून अर्थसंकल्पाची (Budget2023) तयारी सुरू होती सन २०२२-२३ चा मूळ व २०२३-२४ चा सुधारित अर्थसंकल्प आज दिनांक ८ रोजी जि. प. सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी ठराव समितीकडे मांडला.

२०२२- २३ चा २९ कोटी ३६ लाखाचा मूळ अर्थसंकल्प व २०२३-२४ चा सुधारित ३३ कोटी ८० लाखाचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला यंदाचा अर्थसंकल्प हा ९९ लाख ७१ हजार शिलकीचा असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासह ग्रामीण पाणीपुरवठा व पंचायतराज विभागावर चांगली तरतूद करण्यात आली असून, प्राथमिक आरोग्य केंद्र डिजिटल करण्यासह ग्रामीण भागांमध्ये लस पाठविण्यासाठी देखील विशेष तरतूद करण्यात आली आहे.

जि.प.चा यंदाचाही अर्थसंकल्प प्रशासनांकडून सादर करण्यात आला. जि.प. सीईओ डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे वित्त अधिकारी बाबूलाल पाटील, उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नसल्याने सलग दुसऱ्या वर्षी देखील जि. प. अर्थसंकल्प सदस्यांविनाच सादर करण्यात आला.

मूळ अर्थसंकल्प २०२२-२३ चा २९ कोटींचा तर सुधारित अर्थसंकल्प हा ३३ कोटी रुपयांचा होता. ठराव समितीसमोर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, व ठराव समितीने या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली.

लस पोहोचविण्यासाठीच्या अडचणी दूर होणार

जि.प. आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस पोहोचविण्यासाठी ऐनवेळीच तरतूद करावी लागत होती. त्यामुळे या तरतुदीसाठी वेळ खर्च होऊन बराच वेळ वाया जात होता.

तसेच जेव्हा गरज होती तेव्हा अनेक वेळा लसी या आरोग्य केंद्रावर पोहूच शकत नव्हत्या. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात लस पोहोचविण्यासाठी ३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

विभागनिहाय तरतूद

गुणवत्ता विकास कार्यक्रम - ३३ लाख

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग- ७ कोटी ५० लाख

जि.प. कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा - २२ लाख

बांधकाम विभाग - ५ कोटी ३० लाख

समाज कल्याण - १ कोटी ६० लाख

दिव्यांग विकास कार्यक्रम - १० लाख

कृषी विभाग - १ कोटी

पंचायतराज विकास - ७ कोटी ५० लाख

महिला व बालकल्याण विभाग - १ कोटी ३७ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT