Solapur News: जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर व नवनिर्मित ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे. विस्ताराधिकारी किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी ग्रामपंचायतींवर प्रशासक असावा, असा नियम आहे. त्यानुसार ग्रामपंचायत, कृषी, शिक्षण व आरोग्य विभागाचे विस्ताराधिकारी आणि त्यांच्या समकक्ष अंगणवाडी पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायतींच्या प्रशासकाची जबाबदारी सोपविली जाणार आहे..तीन-साडेतीन वर्षांनंतर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवरील ‘प्रशासकराज’ संपले. आता नुकत्याच महापालिका, नगरपालिकांची निवडणूक संपली. सध्या सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांची निवडणूक सुरु आहे..Rural Governance: यवतमाळ जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींवर प्रशासक.दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकांमुळे जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमावा लागणार आहे. त्यानुसार जानेवारीअखेर व फेब्रुवारी- मार्च आणि डिसेंबर २०२६ पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील कोणकोणत्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे पाच वर्षे पूर्ण होतात, याची माहिती जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाने तालुक्यांकडून मागविली आहे..Rural Governance: ग्रामसेवकांवरील दंडाबाबत दोन सदस्यीय समिती निर्णय घेणार.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तसे पत्र पाठविण्यात आले आहे.ग्रामपंचायतींची मुदत संपणाऱ्यापूर्वी तीन महिने आधी निवडणुकीची तयारी सुरु होते. पहिल्यांदा प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी, हरकती व अंतिम मतदार यादी तयार होते. त्याचवेळी प्रभाग रचना, त्यावरील हरकती व अंतिम प्रभागरचना असा तो कार्यक्रम असतो..विस्ताराधिकाऱ्यांची संख्या अशी...विभाग कार्यरत विस्ताराधिकारीग्रामपंचायत ६१आरोग्य १५कृषी १९शिक्षण ३२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.