Jal Jivan Mission  Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jivan Mission : जल जिवन मिशन म्हणजे पैशांची खिरापत वाटपासारखे

Water Supply Scheme : “जलजिवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या कामांची अंदाजपत्रके बनविताना पाण्याचे स्रोत पाहिले नाहीत. स्थानिक अडचणी लक्षात घेतल्या नाहीत.

Team Agrowon

Pune News : “जलजिवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या कामांची अंदाजपत्रके बनविताना पाण्याचे स्रोत पाहिले नाहीत. स्थानिक अडचणी लक्षात घेतल्या नाहीत. त्यामुळे अनेक कामे बंद पडली आहेत. नुसते पाइप गाडून ठेवलेत मात्र नळाला पाणी नाही.

त्यामुळे निधी असूनही अनेक गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. जल जिवन मिशन म्हणजे पैशांची खिरापत वाटण्यासारखे झाले आहे,’’ अशी खंत माजी सहकारमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. १०) आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातील विविध प्रलंबित शासकीय योजनांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत वळसे पाटील बोलत होते.

या वेळी माजी खासदार म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, आदिवासी एकात्मिक प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई आदी उपस्थित होते.

तळेघर ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी कर्मचारी नेमावेत, महाशिवरात्रीच्या दिवशी रुग्णालय सुरू झाले पाहिजे. कातकरी कुटुंबांच्या घरांसाठी जागा संपादन करणे, आदिवासी भाागातील जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करून जास्तीत जास्त कामे सूचवा, यासाठी निधी दिला जाईल.

पोखरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व भीमाशंकर पाणीपुरवठा योजना, आदिवासी भागातील रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा त्वरित भरणे, आदिवासी शेतकऱ्यांच्या मालकीच्या हिरडा झाडांच्या नोंदी सात-बारा उताऱ्यावर करणे, कलम ३५च्या जमिनी मूळ मालकांच्या नावे करणे, प्रलंबित वैयक्तिक व सामूहिक वनदावे मंजूर करण्यासाठी प्रक्रिया राबविणे, आंबेगाव तालुक्यातील पुर्नवसित गावठाणांच्या ग्रामपंचायती विभक्त करणे, आहुपे येथील साकरमाचीचे पुनर्वसन प्रक्रिया, धरणग्रस्तांचे पुनवर्सन, अतिउपसा म्हणून घोषित झालेली गावे वगळणे, बीएसएनएल टॉवरची कामे लवकर पूर्ण करणे आदी विषयांवर चर्चा झाली.

आंबेगाव तालुक्यातील अतिसंवेदनशील असलेल्या जांभोरी, काळवाडी नं.१, काळवाडी नं.२, पोखरी बेंढारवाडी, माळीण पसारवाडी, मेघोली, पंचाळे बुद्रुक या गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासंदर्भात चर्चा झाली. या कामांसाठी शासकीय निधी सोडून सीएसआर उपलब्ध करून दिला जाईल. या महिनाअखेरपर्यंत कामे सुरू झाली पाहिजेत, असे नियोजन करा. चर्चा झालेल्या प्रलंबित विषयांवर संबंधित विभागाने कोणती कार्यवाही केली याचा आढावा १० मार्च रोजी घेतला जाईल.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे
पुनर्वसनात ज्यांना जमिनी मिळाल्या नाहीत, अशा लोकांकडून एजंट लोक साध्या करारावर जमिनी विकत घेतात. हे एजंट या प्रकरणाची परवानगी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा करून याला मंजुरी घेवून या जमिनी जादा किमतीने पुढे विकत आहेत. अशा एजंटचे मोठे रॅकेट यामध्ये तयार झाले असून गरिबांच्या जमिनी कवडीमोल भावात विकत घेऊन पुढे जादा किमतीने विकत आहेत. हे जिल्हाधिकारी यांनी थांबवावे यावर कारवाई करावी.
- दिलीप वळसे पाटील, माजी सहकार मंत्री तथा आमदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तूर्तास टळला?

Agricultural Scheme: शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टरसह कृषी अवजारांसाठी सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

Soybean Pest Control : सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्यांचे व्यवस्थापन

Mathura Labhan Cattle Breed : मराठवाड्यातील देखणा गोवंश ः मथुरा लभाण

Humani Control: १५ दिवसांत हुमणी करा गायब; हुमणी नियंत्रणाचे सोपे ३ मार्ग !

SCROLL FOR NEXT