Heavy Rainfall Warning: माॅन्सूनने आज गोव्यापर्यंत मजल मारली आहे. पुढील २ दिवसांत माॅन्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास पोषक हवामान आहे. तसेच राज्यातील अनेक भागात पुढील ५ दिवस वादळी पावसाची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. .माॅन्सूनने आज कर्नाटक, तमिळनाडू आणि गोव्याच्या काही भागात प्रगती केली आहे. गोव्याच्या काही भागात, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या आणखी काही भागात माॅन्सूनने चाल केली. तसेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातही माॅन्सूनने प्रगती केली. माॅन्सूनची सिमा आज गोव्यातील पंजीम, कर्नाटकातील बंगळूरू तर तमिळनाडूतील सालेम आणि पामबम भागात होती. .Monsoon In Kerala: आनंदघन केरळात.माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवसांत माॅन्सून संपूर्ण गोवा व्यापून महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटकचा आणखी काही भाग, तमिळनाडूचा उरलेला भाग व्यापण्याची शक्यता आहे. तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचाही काही भाग माॅन्सून व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. .Vidarbha Rain Forecast: विदर्भात वादळी पावसाचा इशारा.राज्यात पुढील ५ दिवस अनेक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने आज संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे..उद्याही संपूर्ण कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे..रविवारी आणि कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.