Kharif Season Fertilizer: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने अकोला जिल्ह्यात मोठी धडक कारवाई केली आहे. कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता आढळून आल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने तपासणी व सुनावणीनंतर सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. तसेच तीन कृषी केंद्रांचे परवाने एक ते दोन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले असून सहा केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे..तपासणी आणि सुनावणीदरम्यान समाधानकारक खुलासा व स्पष्टीकरण न देऊ शकल्याने कृषी सेवा केंद्रांवर कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. यात मे. राम कृषी सेवा केंद्र, बोर्डी (ता. अकोट), मोहन ट्रेडर्स, अकोली जहाँगीर (ता. अकोट), मे. महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र, तळेगाव बुद्रूक (ता. तेल्हारा), शिवशक्ती अॅग्रोटेक, सस्ती (ता. पातूर), शेतकरी कृषी सेवा केंद्र, खानापूर रोड, पातूर, .Fertilizer Shop License Suspension: सातारा जिल्ह्यात खत विक्रेत्यांवर कारवाई.बळीराजा कृषी सेवा केंद्र, वाडेगाव (ता. बाळापूर), जगदंब ॲग्रो एजन्सीज अँड ॲग्रोटेक, बादलापूर, अकोला यांचा समावेश आहे. तर मे. आपलं ग्रोमर कृषी सेवा केंद्र (निंबा फाटा, ता. बाळापूर), शेतकरी पुत्र कृषी सेवा केंद्र (वारखेड, ता. तेल्हारा) आणि मातोश्री कृषी सेवा केंद्र (कापशी रोड, कापशी) या तीन केंद्रांचे परवाने काही दिवसांसाठी निलंबित करण्यात आले..Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित .कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी यांनी संयुक्तपणे विविध कृषी सेवा केंद्रांची अचानक तपासणी केली होती. या मोहिमेत १६ कृषी केंद्रांमध्ये गंभीर स्वरूपाच्या नियमबाह्य बाबी आढळून आल्या. साठ्यातील तफावत, दरफलक नसणे, बिलांमध्ये हेराफेरी, परवान्याची लपवाछपवीचे प्रकार उघडकीस आले..खरीप हंगामात बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या विक्रीत काळाबाजार, साठेबाजी किंवा एका वस्तूसोबत दुसरी वस्तू घेण्याची सक्ती अशा प्रकारांना अजिबात सहन केले जाणार नाही. लुबाडणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे. तसेच दोषींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.-डाॅ. मुरली इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.