Jal Jivan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jivan Mission : जलजीवन मिशनला मुदतवाढ; तरीही कामे संथगतीने

Water Supply Scheme : हर घर जल (जल जीवन मिशन) योजनेच्या कामांना आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देऊनही जिल्ह्यातील निम्मी कामे अजूनही संथ गतीने सुरू आहेत.

Team Agrowon

Sangli News : हर घर जल (जल जीवन मिशन) योजनेच्या कामांना आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देऊनही जिल्ह्यातील निम्मी कामे अजूनही संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे वर्षानंतरही ३४१ योजना अपूर्ण असून, केवळ १५३ योजनांचे हस्तांतरण झाले आहे. मात्र मुदत वाढीमुळे योजनेच्या खर्चात १३२ कोटींची वाढ झाली आहे.

सांगली जिल्ह्यात ‘हर घर जल योजना’ अंतर्गत जल जीवन मिशनच्या ६८३ योजनांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी सुरुवातीचा खर्च ७९२ कोटी २१ लाखाचा अपेक्षित होता. प्रत्यक्षात हा खर्च आता ९२४ कोटींवर गेला आहे. मात्र योजनेतील आतापर्यंत ३६३ कामेच पूर्ण झाली आहेत. अजून ३२० योजनांची कामे प्रगतिपथावर आहे.

माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हा परिषदेत वर्षभरापूर्वी झालेल्या बैठकीत जल जीवन मिशनची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. कामे झाली नाहीत तर कारवाईचा इशाराही दिला होता. त्यालाही आता वर्ष उलटले आहे. मात्र अद्यापही योजना पूर्ण झाली नाही.

खर्च १३२ कोटींनी वाढला

जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये ६८३ गावात ही योजना राबवण्यात येत आहे. त्यासाठी प्रारंभी ७९२.२१ कोटींचा खर्च अंदाजित होता. मात्र कामे लांबत गेल्यामुळे खर्च १३२ कोटींनी वाढला आहे. सध्या हा अंदाजित खर्च ९२४ कोटी ५२ लाखांवर गेला आहे. या निधीतील आतापर्यंत ४४४ कोटी खर्च झाला आहे. म्हणजे ४८० कोटी रुपये अजून खर्च होणार आहे. मार्च अखेर १०० कोटींच्या निधींची आवश्यकता आहे.

केवळ सहा कामे पूर्ण

ऑक्टोबर अखेर या योजनेत आतापर्यंत ३३६ कामे पूर्ण झाली होती. त्यानंतर गेल्या दोन महिन्यात केवळ सहा कामे पूर्ण झाली आहेत. तर मार्चनंतर गेल्या नऊ महिन्यात केवळ ११६ कामे पूर्ण झाली आहेत

दृष्टिक्षेपात जलजीवन मिशन योजना

एकूण कामे ६८३

अंदाजे खर्च ९२४ कोटी ५२ लाख

आजवरचा खर्च ४४४ कोटी

प्रगतीपथावरील योजना ३२०

पूर्ण झालेल्या योजना ३६३

हस्तांतर केलेल्या योजना १७४

जल जीवन मिशनच्या कामांची स्थिती

तालुका योजना पूर्ण

आटपाडी ५४ ४०

जत १०२ ३७

कडेगांव ५५ २४

क. महांकाळ ६८ २८

खानापूर ७० ५१

मिरज ५१ २२

पलूस ३२ २४

शिराळा ८५ ४८

तासगाव ७४ ४९

वाळवा ९२ ४०

एकूण ६८३ ३६३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Urea Shortage : युरिया टंचाईवर ग्रीन अमोनियाची मात्रा?

Manikrao Kokate Controversy : बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना

MSP Committee : हमीभाव समितीच्या तीन वर्षांत सहा बैठका

Atal Pension Yojana : आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून?

Maharashtra ITI upgrade : राज्यातील शंभर ‘आयटीआय’चे बळकटीकरण करणार

SCROLL FOR NEXT