Jaggery Production Agrowon
ॲग्रो विशेष

Jaggery Production : गुऱ्हाळघरे अद्याप थंडच

Jaggery Rate : सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील गुऱ्हाळघरे अद्याप थंडच आहेत. दररोज पडणारा पाऊस गुऱ्हाळघरांच्या सुरुवातीच्या तयारीत अडसर बनत आहे.

Team Agrowon

Kolhapur News : सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील गुऱ्हाळघरे अद्याप थंडच आहेत. दररोज पडणारा पाऊस गुऱ्हाळघरांच्या सुरुवातीच्या तयारीत अडसर बनत आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात गुऱ्हाळाच्या कामास सुरुवात केली जाते.

‘गुऱ्हाळघरांचे माहेर’ समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात गुऱ्हाळे दिवाळीनंतरच गती घेतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, पाऊस कधी थांबतो या प्रतीक्षेत गुऱ्हाळघरमालक आहेत.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला तो अद्याप सुरू असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पावसामुळे ऊस हंगाम लांबणीवर पडल्याने गुऱ्हाळघरे सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या गुऱ्हाळघर मालकांच्या तयारीवर पाणी पडले आहे.

आतापर्यंत अंतर्गत कामे पूर्ण झाली असून, जळण बाहेर काढून ते वाळविण्यासाठी पसरवण्यास सुरुवात होणार होती, तोच पावसाने सुरुवात केल्यामुळे काहीजणांचे जळण भिजले. त्यामुळे गुऱ्हाळमालक हतबल झाले आहेत.

पावसामुळे शिवारे तुंबल्यामुळे ऊस तोडणीत अडथळा निर्माण झाला आहे. उसाने भरलेली वाहने शेतातच अडकण्याचा धोका असतो. दिवसा ऊन आणि सायंकाळी ढग जमा होऊन जोरदार पावसाला सुरुवात होते.

त्यामुळे तोडणीत व्यत्यय निर्माण होतो. त्याचा परिणाम गुऱ्हाळ व्यवसायावर होतो. त्यामुळे पाऊस पूर्ण थांबल्यावरच गुऱ्हाळ सुरू करणार असल्याचे गुऱ्हाळघर मालकांचे म्हणणे आहे. पावसाने गुऱ्हाळघर मालकांची चिंता वाढली असून, त्याचा परिणाम हंगामावर होणार आहे. त्यामुळे सर्वजण पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत.

मजूर टंचाई

मजुरांची टंचाई यंदाही भासणार आहे. खात्रीशीर मजूर शोधण्यासाठी गुऱ्हाळघर मालकांनी शोधमोहीम सुरू केली आहे. कित्येकदा परजिल्ह्यातील मजूर गुऱ्हाळ मालकांकडून पैसे घेऊन पसार होतात. यामुळे काम थांबते आणि आर्थिक नुकसान होते. त्यामुळे स्थानिक मजुरांचा शोध सुरू आहे, तसेच साखरेच्या भावावरच यंदा गुऱ्हाळाचे भवितव्य ठरणार आहे.

सध्या गुऱ्हाळघरे सुरू करण्यात पावसाचा व्यत्यय निर्माण झाला आहे. अतिरिक्त पाऊस झाल्याने उसाची उंची खुंटली आहे. त्यामुळे यंदाच्या गुऱ्हाळ हंगामावर याचा परिणाम होणार आहे. स्थानिक मजूर शोधण्याचे काम सुरू असून ते भात कापणीच्या कामात गुंतले आहेत.
- अमर पाटील, गुऱ्हाळ मालक, बसरेवाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

RBI Report : देशातील महागाई दर कमी होणार; रब्बी उत्पादन वाढीचा आरबीआयचा अंदाज 

Soybean Market : सोयाबीनच्या हमीभावाला बारदान्याची अडचण

Pandharpur Wari Management : वारी कालावधीत वारकऱ्यांच्या सुविधांबाबत योग्य नियोजन करावे

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाने पिकांचे अंदाजे २ कोटींचे नुकसान

Rural Development Department : यशवंत पंचायतराज समितीकडून सोलापूर जिल्हा परिषदेची तपासणी

SCROLL FOR NEXT