Jaggery Seizure : कर्नाटकातून सांगलीत येणाऱ्या गुळाची अडवणूक

Jaggery Trucks Stopped: कर्नाटक येथील पणन मंडळाकडून सांगलीकडे येणारा गूळ अडविण्यात येत आहे. दहा गुळाचे ट्रक गुरुवारी (ता. २६) अडविण्यात आले.
Jaggery
Jaggery Agrowon
Published on
Updated on

Sangli Jaggery News : कर्नाटक येथील पणन मंडळाकडून सांगलीकडे येणारा गूळ अडविण्यात येत आहे. दहा गुळाचे ट्रक गुरुवारी (ता. २६) अडविण्यात आले. म्हैसाळ येथे जीएसटी विभागाकडूनही गूळ अडवणूक करून शेतकऱ्यांकडे जीएसटी भरण्याबाबत तगादा लावण्यात येत आहे. त्याविरोधात सांगलीतील व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील मार्केट यार्डात जिल्ह्यासह विविध राज्यांतून गूळ, हळद, बेदाणा, धान्य आदी शेतीमालाची आवक होत असते. तेथील बाजारपेठेत चांगला दर मिळतो. वेळेवर पैसेही शेतकऱ्यांना मिळतात. त्यामुळे बाजारपेठेबाबत विश्वासार्हता निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी गूळ (Jaggery) तयार करण्याअगोदर व्यापाऱ्यांकडून अनामत घेतात.

Jaggery
Jaggery Production : कर्नाटकच्या पणन विभागाचा मनमानी कारभार, सीमा भागातील गुळाची अडवणूक

गूळ तयार झाल्यानंतर तो विक्रीसाठी सांगली बाजार समितीकडे पाठवतात. काही दिवसांपासून कर्नाटक येथील बाजार समितीकडून सांगलीत येणाऱ्या गुळाची वारंवार अडवणूक केली जात आहे‌. तरीसुद्धा शेतकरी सांगलीत गूळ घेऊन येतात.

त्याशिवाय जीएसटी (GST) विभागाकडूनही गूळ अडवून चौकशी केली जात आहे. शेतकऱ्याच्या मालाला जीएसटी लागू होत नाही. तरीसुद्धा तगादा लावला जात आहे. त्याचा हळदीच्या आवकेवर परिणाम होत आहे‌.

Jaggery
Jaggery Market : श्रावणामुळे बिगर हंगामी गुळाचा गोडवा महागला

मागील काही दिवसांपासून कर्नाटक (Karnataka) येथील बाजार समितीकडून सांगलीत येणाऱ्या गुळाने भरलेल्या गाड्या कागवाड येथे अडविल्या जात आहेत. त्याशिवाय जीएसटी विभागाकडूनही गूळ अडवून जीएसटीबाबत विचारणा केली जात आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला जीएसटी लागू होत नाही. तरीसुद्धा जीएसटीबाबत तगादा लावला जात आहे. गुळाच्या गाड्यांची अडवणूक केली जात असल्याने त्याचा गुळाच्या आवकेवर परिणाम होत आहे. व्यापाऱ्यांकडून याबाबत प्रयत्न केला जात आहे.

सांगली बाजार समितीत कर्नाटकातून येणारा गूळ अडविला जात असल्याबाबत तेथील स्थानिक आमदारांशी संपर्क साधण्यात आला. शनिवारी (ताय २८) त्यांनी याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले, याशिवाय कर्नाटकच्या पणन संचालकांशी याबाबत मार्ग काढण्याची विनंती करणार असल्याचे सभापती सुजय शिंदे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com