Cooperative Bank: जिल्हा बँकेच्या ‘आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टिम’ सेवेला सुरुवात
Digital Banking: अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आधुनिक बँकिंगकडे मोठी झेप घेत ‘आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टिम’ (AePS) सेवेचा शुभारंभ केला आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते हा उपक्रम सुरू झाला असून, ग्रामीण भागातील ग्राहकांना यामुळे डिजिटल व्यवहाराची सुलभता मिळणार आहे.