Agriculture Product Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Agriculture Products : नैसर्गिक कृषिमालाला बाजारपेठ मिळवून देणार

Jitendra Dudi : नैसर्गिकरीत्या उत्पादित केलेल्या कृषिमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

Team Agrowon

Satara News : शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरात जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच आघाडीवर राहिले असून, त्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्याचे काम कृषी विभागाने करावे; त्यांनी नैसर्गिकरीत्या उत्पादित केलेल्या कृषिमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. डुडी बोलत होते. या कार्यशाळेस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विकास बंडगर आदी उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, की नैसर्गिक शेती पद्धतीचे तंत्रज्ञान कृषी विभागाकडे आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. नैसर्गिक शेतीसाठी प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड करण्यासह गट शेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणावे.

शासनाने येत्या ३ वर्षांत २२ हजार हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट सहजपणे पूर्ण करण्यासाठी सर्व जण प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

नैसर्गिक शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशीही माहिती श्री. डुडी यांनी दिली.

मुंबई, पुणे येथे नैसर्गिकरीत्या उत्पादित कृषी उत्पादनांना मोठी मागणी असून दरही चांगले मिळत आहेत. शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन त्याचे फायदे सांगावेत. सातारा जिल्हा नैसर्गिक शेतीमध्ये क्रांती निर्माण करून देशात आदर्श प्रस्थापित करील, असा विश्‍वासही श्री. डुडी यांनी व्यक्त केला.

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी कृषी विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

प्रत्येक तालुक्यात नैसर्गिक शेतीबाबत कार्यशाळा आयोजित करून नैसर्गिक शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे प्रास्ताविकात श्रीमती फरांदे यांनी सांगितले. या कार्यशाळेस नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ वक्ते संग्राम पाटील, सुजित पाटील, आनंत गव्हाणे, स्वाती गुरव, कृषी विभागातील अधिकारी आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

HTBT Cotton Seed: ‘एचटीबीटी’ बियाण्यावर बंदी नको, परवानगी द्या: घनवट

Trader License Suspension: सोलापूर बाजार समितीतील १९ अडत्यांचे परवाने रोखले

Baramati By Election: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी : नाना पटोले

Agriculture Input Crisis: पॅकेजिंग साहित्यटंचाईची खते, बियाण्यांना झळ

Revenue Department Reform: ‘वन डिस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन’ संकल्पनेतून मालमत्ता नोंदणी

SCROLL FOR NEXT