Agriculture Production : देशात फलोत्पादन, अन्नधान्यात विक्रमी वाढ

Food Grain Production : २०२२-२३मधील चांगल्या मॉन्सून हंगामानंतर अन्नधान्य आणि फलोत्पादन पिके नवा विक्रम स्थापित करणार आहेत. अन्नधान्य ३३० दशलक्ष, तर फलोत्पादन ३५२ दशलक्ष टनापर्यंत पोचणार आहे.
Agriculture Production
Agriculture ProductionAgrowon
Published on
Updated on

Latest Agriculture News : देशात अन्नधान्याबरोबरच फलोत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. २०२२-२३ मध्ये विविध फलोत्पादन पिकांचे एकूण ३५१.९२ दशलक्ष टन (१.३७ टक्के वाढ) उत्पादन झाल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आपल्या दुसऱ्या आगाऊ अंदाजात दिली आहे.

२०२२-२३मधील चांगल्या मॉन्सून हंगामानंतर अन्नधान्य आणि फलोत्पादन पिके नवा विक्रम स्थापित करणार आहेत. अन्नधान्य ३३० दशलक्ष, तर फलोत्पादन ३५२ दशलक्ष टनापर्यंत पोचणार आहे.

फलोत्पादनात २०२२-२३ यावर्षी सुमारे ४.७४ दशलक्ष टन (१.३७ टक्के) वाढ होऊन ते विक्रमी ३५१.९२ दशलक्ष टनापर्यंत पोचणार असल्याचे केंद्रीय कृषी विभागाच्या माहितीतून समोर आले आहे. यात फळे, भाजीपाला, लागवड पिके, फळभाज्या, फुले, मध यांच्या उत्पादनात वाढीची अपेक्षा आहे.

Agriculture Production
Agriculture Production : देशात भातासह तूर, उडीद तेलबियांच्या उत्पादनात घट

यावर्षात १०८.३४ दशलक्ष टन फळ उत्पादन अपेक्षित आहे. २०२१-२२मध्ये हेच उत्पादन १०७.५१ दशलक्ष टन होते. २०२१-२२ मधील २०९.१४ दशलक्ष टनांच्या तुलनेत २०२२-२३ मध्ये भाजीपाल्याचे उत्पादन २१२.९१ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे.

बहुवार्षिक पीक लागवडीखालील (ऊस, चहा, कॉफी आदी) पिकांचे उत्पादन २०२१-२२ मध्ये १५.७६ दशलक्ष टना वरून २०२२-२३ मध्ये १६.०५ दशलक्ष टन पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, यात सुमारे १.७८ टक्के वाढ असेल. तसेच बटाट्याचे उत्पादन २०२१-२२च्या ५६.१८ दशलक्ष टनाच्या तुलनेत २०२२-२३मध्ये ६०.५४ दशलक्ष टन अपेक्षित आहे.

Agriculture Production
G20 Summit Agriculture Product : G20 नेत्यांना भेट दिलेली टॉप ५ कृषी उत्पादने जाणून घ्या

अन्नधान्य उत्पादनात २०२१-२२च्या तुलनेत २०२२-२३ यावर्षी सुमारे १४ दशलक्ष टन उत्पादन वाढीचा (४ टक्क्यांवर) अंदाज कृषी विभागाच्या अंतिम अंदाजात व्यक्त करण्यात आला आहे.

तर गेल्यावर्षीच्या तुलनेत फलोत्पादन ५ दशलक्ष टन वाढेल (१ टक्क्यांवर) असे मंत्रालयाच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजात म्हटले आहे. अन्नधान्य बास्केटमध्ये २०२२-२३ यावर्षात भात, गहू यांचे (जुलै ते जून चक्रीवर्ष) अनुक्रमे १३५ दशलक्ष टन आणि ११० दशलक्ष टन उत्पादन नोंदले गेले आहे.

‘‘अन्नधान्याबरोबरच फलोत्पादनात गेल्यावर्षी विक्रमी उत्पादन झाले आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या कष्ट, शास्त्रज्ञांची कार्यक्षमता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली केंद्र सरकारची शेतकरी हिताची धोरणे यांचे चांगले फळ आहे.’’
- नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय कृषिमंत्री.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com