Agriculture GI : महाराष्ट्रातील नऊ उत्पादनांना ‘जीआय’

GI Tagging For Agriculture Produce : कृषीसह विविध उत्पादना संबंधित भौगोलिक निर्देशांक (जीआय) घेण्यामध्ये महाराष्ट्र राज्याने देशात पाचव्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे.
Agriculture GI
Agriculture GIAgrowon
Published on
Updated on

Pune News : कृषीसह विविध उत्पादना संबंधित भौगोलिक निर्देशांक (जीआय) घेण्यामध्ये महाराष्ट्र राज्याने देशात पाचव्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या एकूण २९ भौगोलिक निर्देशांकामध्ये (कृषी व बिगरकृषीसह) नुकतीच नव्याने नऊ ‘जीआय’ची भर पडली आहे.

यात मराठवाड्यातील कृषी उत्पादनांची संख्या अधिक असून प्रमुख मिळालेल्या जीआयमध्ये पानचिंचोळी (लातूर) येथील चिंच, बहाडोली जांभूळ (पालघर), जालन्याची दगडी ज्वारी, कास्ती कोथिंबीर (लातूर) आदींचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून महाराष्ट्रातील या नऊ उत्पादनांना जीआयची स्वीकृती देऊन सरकारी गॅझेटमध्ये तशी नोंदही करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याने प्राप्त केलेल्या जीआय उत्पादनांची संख्या आता ३८ झाली आहे. त्यात चार बिगरकृषी आणि ३४ कृषीशी संबंधित उत्पादनांचा समावेश आहे. जीआय प्राप्त करण्यामध्ये महाराष्ट्राने भारतात पाचव्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे.

छोट्या गावांचा समावेश हे उल्लेखनीय

जीआय मिळवून देण्यामध्ये पुढाकार लाभलेल्या पुणे येथील ‘जीएमजीसी’ संस्थेचे प्रमुख गणेश हिंगमिरे म्हणाले की नव्याने प्राप्त झालेल्या नऊ ‘जीआय’ मधील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील छोट्या गावांचा या माध्यमातून एक प्रकारे सन्मान झाला आहे. आवर्जून सांगायचे तर यापूर्वी दार्जिलिंग चहा यासारखी मोठी उदाहरणे आपल्यासमोर आहेत.

Agriculture GI
Agriculture GI : कृषी उत्पादनाच्या ‘जीआय’साठी हवी कृषी विभागाची इच्छाशक्‍ती

मात्र, मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील पानचिंचोळी किंवा तत्सम काही गावांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण जीआय उत्पादनांवर आपले नाव कोरले आहे. असा प्रकारे देशातील कोणतेही छोटे गाव जीआयच्या माध्यमातून पुढे येऊ शकते. त्यातून देश समृध्द होऊ शकतो.

आत्तापर्यंत महाराष्ट्रात आम्ही ५१ उत्पादनांसाठी जीआय चे प्रस्ताव पाठवले होते. पैकी ३८ उत्पादनांना जीआय मिळवण्यात यश आले आहे. उर्वरित १३ उत्पादने जीआय मिळवण्याच्या प्रक्रिया अवस्थेत आहेत असेही हिंगमिरे यांनी सांगितले.

नऊ जीआय उत्पादने पुढीलप्रमाणे...

कृषी संबंधित जीआय (कंसात ज्यांच्या नावे अर्ज प्रस्ताव)

पानचिंचोळी चिंच, पानचिंचोली, ता. निलंगा, जि. लातूर

(पानचिंचोली पातडी चिंच उत्पादक संघ)

बोरसुरी तूर डाळ- बोरसुरी, ता. निलंगा. जि. लातूर

(बोरसुरी तूरडाळ उत्पादक संघ)

कास्ती कोथिंबीर- आशिव, ता. औसा, जि, लातूर

Agriculture GI
Agriculture GI Rating : राज्यात ‘जीआय’नोंदणीत डाळिंब पहिले

(कास्ती कोथिंबीर शेतकरी उत्पादक संघ)

बदलापूर जांभूळ (जि. ठाणे)

(जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास चॅरिटेबल ट्रस्ट, बदलापूर)

बहाडोली जांभूळ (जि. पालघर)

(बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट, बहाडोली)

दगडी ज्वारी, जालना (जय किसान शेतकरी गट, मात्रेवाडी, ता. बदनापूर, जि. जालना)

कुंथलगिरी खवा, पेढा, धाराशिव

(मराठवाडा जीआय संवर्धन संघ, उदगीर, लातूर)

बिगरकृषी जीआय

पेण गणपती

कवडी माळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com