Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Amaravati Rain Update : ऑगस्टमध्ये अमरावतीत बरसला २१ दिवस पाऊस

Rain News : या वर्षी या महिन्यांत २१ दिवस पाऊस झाला असून गत वर्षी केवळ सहा दिवस हजेरी लावली होती. गत वर्षी कोरड्या तर यंदा ओल्या दुष्काळाची चाहूल लागली आहे.

Team Agrowon

Amaravati News : गतवर्षीच्या खरीप हंगामात ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्याने पिकांचे नुकसान झाले होते. यंदा मात्र ऑगस्टमध्ये पावसाने सातत्याने हजेरी ठेवल्याने पिकांची हानी होऊ लागली आहे. या वर्षी या महिन्यांत २१ दिवस पाऊस झाला असून गत वर्षी केवळ सहा दिवस हजेरी लावली होती. गत वर्षी कोरड्या तर यंदा ओल्या दुष्काळाची चाहूल लागली आहे.

या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तविला आहे. नियोजित वेळापत्रकापेक्षा विलंबाने आगमन झालेल्या मॉन्सूनमुळे पेरण्याही उशिरानेच झाल्यात. जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ९१ महसूल मंडलांत ६ लाख ८१ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडदासह तृणधान्याची पेरणी झाली आहे.

मूग व उडदाचे पीक येण्याची वेळ आली आहे. तर, सोयाबीन फुलोऱ्यावर असून जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेला कापूसही फुलोरावस्थेत आला आहे. तुरीचे पीकवाढीच्या अवस्थेत आहे. या पिकांना वाढीसाठी आता पावसाची गरज नसताना तो धो-धो बरसत असल्याने पिके धोक्यात आली आहेत.

जिल्ह्यात यंदा ऑगस्ट महिन्यात २८५.४ मिमी सरासरी पाऊस अपेक्षित आहे. त्यातुलनेत तो गेल्या महिन्याभरात सर्व ९० ही महसूल मंडलांत सरासरी २१ दिवस पाऊस झाला आहे. या पावसाची सरासरी २३७.५ मिमी (८३.२ टक्के) आहे. अतिपावसामुळे सोयाबीन पिवळे पडू लागेल असून सोयाबीनसह कापूस व तुरीची वाढ खुंटण्याची शक्यता आहे.

पावसाची हजेरी अजूनही सुरूच असून तीन दिवसांपासून सलग बरसत असल्याने शेतकऱ्यांची आंतरमशागतीची कामे रखडली आहेत. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे जिल्हा ओल्या दुष्काळाकडे वाटचाल करू लागला आहे. सततच्या पावसाचा थेट परिणाम उत्पादनाच्या सरासरीवर पडणार असून पन्नास टक्के उत्पादनात घट येणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

गतवर्षी ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने कोरडा दुष्काळ सदृशस्थिती निर्माण झाली होती. केवळ सहा दिवस पाऊस झाला होता व त्याची सरासरी ५८.४ मिमी इतकी होती. पिकांना वाढीसाठी आवश्यक असताना पाऊस बेपत्ता झाल्याने पिकांना धोका निर्माण झाला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT